नवी दिल्ली, 6 एप्रिल 2023
चेन्नई विमानतळावरील नवीन अत्याधुनिक एकात्मिक टर्मिनल इमारतीमुळे चेन्नईच्या पायाभूत सुविधांमध्ये महत्त्वाची भर पडेल असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. यामुळे संपर्क व्यवस्थेत सुधारणा होईल आणि स्थानिक अर्थव्यवस्थेलाही फायदा होईल, असेही मोदी यांनी सांगितले.
चेन्नई विमानतळावरील नवीन अत्याधुनिक एकात्मिक टर्मिनल इमारतीच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 8 एप्रिल 2023 रोजी होणार आहे अशी माहिती नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने ट्विट संदेशात दिली आहे.
नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या ट्विटला उत्तर देताना पंतप्रधान म्हणाले;
“यामुळे चेन्नईच्या पायाभूत सुविधांमध्ये महत्त्वाची भर पडेल. तसेच संपर्क व्यवस्थेत सुधारणा होईल आणि स्थानिक अर्थव्यवस्थेलाही फायदा होईल.”
* * *
S.Thakur/V.Ghode/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai@gmail.com /PIBMumbai /pibmumbai
This will be an important addition to Chennai’s infrastructure. It will boost connectivity and also benefit the local economy. https://t.co/lWMBMmvvRU
— Narendra Modi (@narendramodi) April 6, 2023
இது சென்னையின் உள்கட்டமைப்பிற்கு கூடுதல் வலு சேர்க்கும். அதோடு இணைப்பு வசதியை அதிகரித்து உள்ளூர் பொருளாதாரத்திற்கும் ஊக்கமளிக்கும். https://t.co/lWMBMmvvRU
— Narendra Modi (@narendramodi) April 6, 2023