Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

‘चेन्नई कनेक्टमुळे भारत-चीन संबंधांमधील सहकार्याचे नवे पर्व सुरु झाले’ -पंतप्रधान नरेंद्र मोद


तामिळनाडूतील चेन्नई मधील मामल्लापुरम येथील दुसऱ्या अनौपचारिक शिखर परिषदेमुळे भारत आणि चीन दरम्यान सहकार्याचे नवे पर्व सुरु झाल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

आज मामल्लपुरम येथे अनौपचारिक शिखर शिखर परिषदेच्या दुसऱ्या दिवशी पंतप्रधान नरेन्द्र मोदी आणि चीनचे राष्ट्रपति शी जिनपिंग यांच्या अध्यक्षतेखाली प्रतिनिधिमंडळ स्तरावरच्या चर्चेच्या प्रारंभी पंतप्रधान उदघाटनपर वक्तव्य करत होते.

गेल्या वर्षी वुहान येथे दोन्ही देशांदरम्यान झालेल्या पहिल्या अनौपचारिक शिखर परिषदेचा उल्लेख करत पंतप्रधान मोदी म्हणाले की यामुळे आमच्या संबंधांमध्ये स्थिरता वाढली असून नवी गती लाभली आहे.

ते म्हणाले, “दोन्ही देशांदरम्यान सामरिक संवाद देखील वाढला आहे.”

पंतप्रधान पुढे म्हणाले, “आम्ही निर्णय घेतला आहे की आम्ही आमचे मतभेद वादामध्ये रूपांतर होण्यापूर्वीच सोडवू. परस्परांच्या चिंताप्रति आम्ही संवेदनशील राहू आणि आमचे संबंध जागतिक शांतता आणि स्थैर्याच्या दिशेने प्रयत्नरत राहतील.”

मामल्लपुरम मधल्या दुसऱ्या शिखर परिषदेचा उल्लेख करताना पंतप्रधान म्हणाले, “चेन्नई शिखर परिषदेत आम्ही आतापर्यन्त द्विपक्षीय आणि जागतिक मुद्यांवर बरीच चर्चा केली आहे.वुहान शिखर परिषदेने आमच्या द्विपक्षीय संबंधाना नवी गती प्रदान केली आहे. आज चेन्नई कनेक्टने दोन्ही देशांच्या संबंधातील सहकार्याचे नवे पर्व सुरु झाले आहे.”

पंतप्रधान म्हणाले, “दुसऱ्या अनौपचारिक शिखर परिषदेसाठी भारतात आल्याबद्दल मी राष्ट्रपति शी जिनपिंग यांचे आभार मानतो. चेन्नई कनेक्टमुळे भारत-चीन संबंधना अधिक गती मिळेल. यामुळे दोन्ही देशांच्या आणि जगभरातील लोकांचा फायदा होईल.”

**************

B.Gokhale/S.Kane/P.Malandkar