पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने चेन्नई आणि अंदमान व निकोबार बेटांदरम्यान पाण्याखालून एक समर्पित ऑप्टिकल फायबर केबलच्या माध्यमातून थेट दळणवळण जोडणीच्या तरतुदीला मंजुरी दिली.
या प्रकल्पाचा अंदाजे खर्च 1102.38 कोटी रुपये आहे, यात पाच वर्षांसाठी परिचालन खर्च समाविष्ट आहे. डिसेंबर 2018 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होण्याची शक्यता आहे.
या मंजुरीमुळे अंदमान आणि निकोबार बेटांना योग्य बॅण्डविड्थ आणि ई-शासन उपक्रमांच्या अंमलबजावणीसाठी दूरसंचार जोडणी उपलब्ध होईल. तसेच शैक्षणिक संस्थांना ज्ञानाचे आदानप्रदान करण्यासाठी पुरेसे सहाय्य, रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील आणि डिजिटल भारताचे स्वप्न पूर्ण होण्यास मदत होईल.
B.Gokhale/S.Kane/D. Rane