Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

चीन प्रजासत्ताकाचे स्टेट कॉऊन्सिलर यांग जियाची यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट


चीन प्रजासत्ताकाचे स्टेट कॉऊन्सिलर आणि सीमा प्रश्नासंबंधिचे चीनचे विशेष प्रतिनिधी यांग जियाची यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि पंतप्रधान ली क्वीयांग यांच्या शुभेच्छा जियाची यांनी पंतप्रधानांना दिल्या.

चीन आणि भारत दरम्यान सीमा प्रश्नाबाबत झालेल्या चर्चेच्या 20व्या फेरीबाबत यांग जियाची आणि अजित डोवाल यांनी पंतप्रधानांना माहिती दिली.

सप्टेंबर 2017 मध्ये झालेल्या 9व्या ब्रिक्स परिषदेच्यावेळी झियामेन दौऱ्याच्या आठवणींना पंतप्रधानांनी उजाळा दिला. भारत आणि चीन दरम्यानचे मजबूत संबंध केवळ भारत आणि चीनच्या जनतेसाठीच नाही, तर हा विभाग आणि पूर्ण जगासाठी महत्वपूर्ण असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.

*****

S.Tupe/J.Patankar/D.Rane