Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

चीनला रवाना होण्यापूर्वी पंतप्रधानांचे निवेदन


पंतप्रधान नरेंद्र मोदी 27 आणि 28 एप्रिलला चीनमधल्या वुहान इथे भेट देणार आहेत. चीनला रवाना होण्यापूर्वी पंतप्रधानांनी केलेले निवेदन –

चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासमवेत अनौपचारिक शिखर बैठकीसाठी 27-28 एप्रिल रोजी चीनमधल्या वूहानला मी भेट देत आहे.

द्विपक्षीय आणि जागतिक महत्वाच्या विविध मुद्यांवर जिनपिंग आणि मी विचार विमर्श करणार आहोत. भविष्यातली आणि सद्य जागतिक परिस्थितीच्या संदर्भात राष्ट्रीय विकासासाठीचे आमचे दृष्टीकोन आणि प्राधान्य यावरही चर्चा होणार आहे.

धोरणात्मक आणि दीर्घकालीन संदर्भाच्या दृष्टीकोनातून भारत-चीन संबंधाच्या विकासाचा आढावाही घेणार असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

***

B.Gokhale/N.Chitale/D.Rane