चीनच्या राष्ट्रीय दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेथील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.
पंतप्रधानांचा संदेश,
चीनच्या माझ्या बंधू-भगिनींनो,
राष्ट्रीय दिनानिमित्त आपणा सर्वांना शुभेच्छा.
भारत आणि चीन यांच्यात गेली अनेक वर्ष दृढ संबंध आहेत. दोन्ही देश एकत्रितपणे विश्वाचे अधिक उत्तम भविष्य घडवू शकतात. भारत आणि चीनच्या विकासात, आशियाई शतकाचे स्वप्न पूर्ण करण्याची मोठी संधी आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग यांचा सप्टेंबर 2014 मधला भारत दौरा आणि मे 2015 मधील माझ्या चीन दौऱ्याने उभय देशातील भागीदारी आणखी वाढविण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. राष्ट्राध्यक्ष क्षी आणि पंतप्रधान ली यांच्याशी केलेली बातचीत माझ्या स्मरणात ताजी आहे.
पहिल्या आंतरराष्ट्रीय योगदिनी आपला सक्रिय सहभाग आणि उत्साहाबद्दल मी आपले अभिनंदन करतो. आगामी काळात उभय देशातले संबंध अधिक दृढ होतील असा मला विश्वास आहे. विकास आणि समृद्ध मानवतेसाठी दोन्ही देश एकत्रित काम करतच राहतील अशीच आमची अपेक्षा आहे.
आपला
नरेंद्र मोदी
N.Chitale/M.Desai
在中国国庆日,我向中国人民表示祝贺 pic.twitter.com/7S1i4sWeRD
— Narendra Modi (@narendramodi) October 1, 2015
My greetings to the people of China on their National Day. pic.twitter.com/JP4TX1SDvw
— Narendra Modi (@narendramodi) October 1, 2015