Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

चीनचे उपराष्ट्रपती ली युवानचाओ यांनी पंतप्रधानांची भेट घेतली


चीनचे उपराष्ट्रपती ली युवानचाओ यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी पंतप्रधानांनी चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांचा गेल्यावर्षीचा भारत दौरा आणि स्वत: यावर्षी मे महिन्यात केलेल्या चीन दौऱ्याचे स्मरण केले.

आर्थिक आणि विकासात्मक भागीदारी वृध्दिंगत करण्याच्या अनेक संधी भारत आणि चीनकडे आहेत. भारत आणि चीन मधील सहकार्य वाढविण्यासाठी रेल्वे, स्मार्ट सिटीज्‌, पायाभूत सुविधा तसेच शहरी वाहतूक यासारख्या क्षेत्रांमध्ये अनेक संधी उपलब्ध असल्याचे यावेळी पंतप्रधानांनी अधोरेखित केले.

भारतामधील चीनच्या वाढत्या गुंतवणूकीचे पंतप्रधानांनी स्वागत केले तसेच भारतात येणाऱ्या चीनी पर्यटकांची संख्या वाढेल अशी आशा व्यक्त केली. भारत आणि चीनमधील प्राचीन सांस्कृतिक संबंध लोकांचे एकमेकांतील संबंध वृध्दिंगत करण्यासाठी प्रेरक ठरतील.
भारत आणि चीनमधील शांतीपूर्ण सहकार्यात्मक आणि स्थिर संबंध हे क्षेत्रीय व वैश्विक शांती आणि समृध्दीसाठी महत्वपूर्ण आहेत, यावर उभय देशाच्या नेत्यांनी सहमती दर्शवली.

S.Mhatre/S.Tupe/N.Sapre