रणबीर कपूर: गेल्या आठवड्यापासून, आमच्या कुटुंबाचा जो व्हॉट्सॲप ग्रुप आहे, तिथे आम्ही तुम्हाला प्राइम मिनिस्टर जी, पंतप्रधान जी कसे म्हणायचे ते ठरवत होतो! रीमा आत्या मला रोज फोन करून विचारत होती, मी असं म्हणू शकते का, मी तसं म्हणू शकते का?
पंतप्रधान : भाऊ, मी सुद्धा तुमच्या कुटुंबातलाच आहे. तुम्हाला जे म्हणायचं असेल, ते म्हणा.
स्त्री: आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी!
पंतप्रधान: कट!
स्त्री: इतका मौल्यवान वेळ काढून तुम्ही आम्हा सगळ्यांना इथे निमंत्रित केलं आहे. राज कपूर यांच्या वाढदिवसानिमित्त, त्यांच्या 100 व्या वाढदिवसानिमित्त… आम्ही तुमचे आभार मानतो आणि पापाजींच्या चित्रपटातील एक-दोन ओळी मला आठवल्या. मैं ना रहूंगी, तुम ना रहोगे, लेकिन रहेंगी निशानियां!
पंतप्रधान : व्वा!
स्त्री: तुम्ही खूप आदर आणि प्रेम दिले आहे. नरेंद्र मोदी जी, पंतप्रधान, आमच्या कपूर कुटुंबाला किती आदराने वागवतात, हे आज संपूर्ण भारत पाहतो आहे.
पंतप्रधान: अहो, कपूर साहेबांचे योगदान खूप मोठे आहे! आपले स्वागत करण्याची संधी मिळाली आणि राज साहेबांचा 100 वा वाढदिवस म्हणजे भारतीय चित्रपटसृष्टीच्या सुवर्ण प्रवासाचा असा काळ होता, नील कमल हा चित्रपट 1947 साली प्रदर्शित झाला होता आणि आता आपण 2047 सालाकडे प्रवास करत आहोत. 100 वर्षांचा हा प्रवास पूर्ण होईल तेव्हा ते देशासाठी खूप मोठे योगदान असेल. आजच्या मुत्सद्दी जगात सॉफ्ट पॉवरची खूप चर्चा होते, पण ज्या काळात सॉफ्ट पॉवर हा शब्द सुद्धा कोणाला माहिती नव्हता, त्या काळात कदाचित राज कपूर साहेबांनी भारताच्या सॉफ्ट पॉवरची ताकद जगभरात प्रस्थापित केली होती. म्हणजेच एक प्रकारे त्यांनी भारताची फार मोठी सेवा केली होती.
स्त्री: रणबीरला असा अनुभव आला होता. तो गाडीत बसला होता आणि एक रशियन टॅक्सी ड्रायव्हर होता. त्याने विचारले, तुम्ही भारतीय आहात का? हो आणि तो गाणे गात होता, मी राज कपूरचा नातू आहे, सांग बरे, बेटा!
रणबीर कपूर: मी सांगितले की मी त्यांचा नातू आहे, त्यामुळे मला नेहमी टॅक्सीची सेवा मोफत मिळत असे.
पंतप्रधान: एक काम करता येईल का, विशेषत: मध्य आशियासाठी, असा चित्रपट तयार करावा, जो तेथील लोकांच्या हृदयावर आणि मनावर राज्य करेल. मी तुम्हाला सांगतो, आज इतक्या वर्षांनंतरही, म्हणजे आजही राज साहेबांचा प्रभाव कायम आहे.
स्त्री : आजकाल लहान मुलांनाही खूप गाणी शिकवली जातात!
पंतप्रधान: म्हणजे त्यांच्या आयुष्यात, त्यांच्या आयुष्यावर प्रभाव आहे. मला वाटते मध्य आशियामध्ये मोठी क्षमता आहे. जी आपण पुनरुज्जीवीत केली पाहिजे. आपण नव्या पिढीशी या दुव्याशी जोडले पाहिजे. हा दुवा तयार व्हावा, असे काही सर्जनशील कार्य केले पाहिजे आणि करता येईल.
स्त्री: त्यांना इतकं प्रेम मिळालं की आंतरराष्ट्रीय स्तरावरही त्याचं नाव झालं आणि आपण त्यांना खरं तर सांस्कृतिक दूत म्हणू शकतो. आज मी तुम्हाला सांगू इच्छिते की ते एक लहानसे सांस्कृतिक दूत होते. पण आपल्या भारताच्या पंतप्रधानांनी तर आम्हाला जगाच्या नकाशावर आणले आणि आम्हाला याचा खूप अभिमान वाटतो. या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला खूप अभिमान वाटतो.
पंतप्रधान : बघा, आज देशाची प्रतिष्ठा खूप वाढली आहे, खूप वाढली आहे. फक्त योगविद्येचे उदाहरण घ्या, आज जगातील कोणत्याही देशात जा, तुम्हाला योगविद्येबद्दल इतके…
स्त्री: आई आणि मी, आम्ही दोघी, बेबो, लोलो, आम्हा सर्वांनाच योगविद्येमध्ये खूप रस आहे.
पंतप्रधान: जगातील जेवढ्या नेत्यांना मी भेटतो, दुपारचे, रात्रीचे जेवण सोबत करतो, तेव्हा माझ्या आजू-बाजूला जे बसलेले असतात ते माझ्यासोबत योगविद्येबद्दल आवर्जून संवाद साधतात.
व्यक्ती: ही एक छोटीशी श्रद्धांजली आहे, आजोबांसाठी. निर्माता म्हणून हा माझा पहिलाच चित्रपट आहे आणि माझ्या कुटुंबासोबत काहीतरी करण्याचे माझे स्वप्न होते, त्यामुळे या चित्रपटात सर्व काही आहे.
महिला:- एक गोष्ट सांगू का? हा तो असा नातू आहे, सगळी नातवंडंच आहेत माझी, माझी दोन मुलं, ही आपल्या आजोबांना कधी भेटलीही नव्हती आणि ही चित्रपट बनवत आहेत आणि सर्व त्यांचे.. अरमानने तर प्रत्येक गोष्टीचा इतका शोध घेतलाय त्यात थोडेफार तो जे तयार करतोय तो स्वतः:साठीच बनवत आहे.
व्यक्ती:- आम्ही जे काही शिकलो आहे ते चित्रपटांच्या माध्यमातून आणि जे आईने शिकवलं आहे त्यातून तर शिकलो मी !
पंतप्रधान : बघा आपण जेव्हा संशोधन करता ना तेव्हा आपण खरं तर ते जगत असता. त्या जमान्यात जगत असता. तर आपण मोठे नशीबवान आहात की जरी आपण आपल्या आजोबांना पाहिले नसेल पण त्यांचे जीवन जगण्याची संधी आपल्याला मिळाली आहे.
व्यक्ती:- हो अगदी, हे माझं एक मोठं स्वप्न आहे. मी खरंच कृतज्ञ आहे की संपूर्ण कुटुंब यात सहभागी झाले.
पंतप्रधान:- मला आठवतंय की आमच्यावेळी यांच्या चित्रपटांची काय ताकद होती. जनसंघाचा काळ होता आणि दिल्लीत निवडणुका होत्या. निवडणुकीत जनसंघाचे लोक हरले तर अडवाणी अटलजींनी म्हटलं की अरे निवडणुका तर हरलो. आता काय करायचं? म्हणाले चला चित्रपट बघूया. चित्रपट बघायला गेले. राज कपूर साहेबांचा चित्रपट, फिर सुबह होगी. जनसंघाचे दोन नेते पराभवानंतर जातात आणि चित्रपट बघतात. फिर सुबह होगी आणि आज खरोखरच पुन्हा पहाट झाली. मी चीनमध्ये होतो. आपल्या वडिलांचे एक गाणे होते, ती माणसे प्ले करत होती. मी माझ्या साथीदारांना म्हटलं याचे मोबाईल फोनवर रेकॉर्डिंग करा आणि मग ते मी ऋषी साहेबांना पाठवलं. अरे, ते एवढे खुश झाले.
आलिया :- खरं म्हणजे अलीकडेच, आपण मला वाटतं आफ्रिकेत गेला होतात आणि तिथेसुद्धा.. मी क्लिप बघितली होती की एका सैनिकाबरोबर होतात आणि तो त्यावेळेस माझं गाणं गात होता. मी ती पाहिली आणि बऱ्याच लोकांनी मला पाठवलीही होती. एक गोष्ट मला सांगावीशी वाटते. गाणे ही गोष्ट लोकांना एकत्र आणते. खास करून जी हिंदी गाणी आहेत ती लोक गातच असतात. कधीकधी शब्द समजले नाही तरी आणि मी बरेचदा पाहिले आहे जेव्हा आम्ही प्रवास करतो तेव्हा खास करून अर्थात राज कपूर सॉंग्स. पण अजूनही मला असं वाटतं की एक ज्या खास भावना आणि संवेदना असतात ना, आपल्या गाण्यात. सगळे जण अगदी लगेच कनेक्ट होतात आणि त्याबरोबरच एक प्रश्न होता आपल्यासाठी आपल्याला गाणं ऐकणं शक्य होतं का?
पंतप्रधान:- मी ऐकतो कारण मला आवडतात कधी संधी मिळाली की मी आवर्जून ऐकतो.
सैफ अली खान :- आपण पहिले पंतप्रधान आहात ज्यांना मी भेटतो आहे आणि अगदी समोरासमोर म्हणजे आम्ही आपली वैयक्तिकरित्या भेट घेतली आहे. दोन वेळा भेटलो होतो. आपल्यात एवढी चांगली एनर्जी आहे आणि आपण एवढी मेहनत करता. आपण जे करत आहात त्यासाठी मला आपले अभिनंदन करायला आवडेल आणि आपण आमच्यासाठी आपली दारे उघडलीत त्याबद्दल धन्यवाद आणि आमच्या सगळ्यांची भेट घेतल्याबद्दल आणि एवढे ॲक्सेसिबल झालात त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद ….
पंतप्रधान :- मी आपल्या वडिलांना भेटलो आहे आणि आज मी विचार करत होतो की आज मला तीन पिढ्यांना भेटण्याची संधी मिळते आहे पण आप तिसऱ्या पिढीला आणलं नाही.
करिष्मा कपूर :- आणायचं होतं
महिला:- हे सगळे मोठे अभिनेते आहेत. आम्ही काही फारशा भव्य क्षेत्रात नाही. माझी मुलं त्यांच्या परीने प्रयत्न करत आहेत तरी सुद्धा आम्हाला पंतप्रधानांकडून आमंत्रण आलं म्हणजे…. पापा धन्यवाद.
रणबीर कपूर :- 13, 14 आणि 15 डिसेंबरला आम्ही राज कपूर यांचा एक रेट्रोस्पेक्टिव्ह करत आहोत. भारत सरकार, एनएडीसी आणि एनएफएआय यांच्याकडून आम्हाला खूप मदत झाली. आम्ही त्यांचे दहा चित्रपट पाहून त्यांचे ऑडिओ आणि व्हिज्युअल रिस्टोअर केले. तर आम्ही संपूर्ण हिंदुस्तानमध्ये जवळपास 160 थिएटर्स मध्ये, 40 शहरांमध्ये जवळपास 40 शहरांमध्ये त्यांचे चित्रपट दाखवत आहोत. 13 तारखेला जो आमचा प्रीमियर आहे तो आम्ही मुंबईत करत आहोत. त्यासाठी संपूर्ण फिल्म इंडस्ट्रीला आम्ही आमंत्रण दिलं आहे.
***
S.Tupe/V.Sahajrao/M.Pange/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai@gmail.com
This year we mark Shri Raj Kapoor Ji’s birth centenary. He is admired not only in India but all across the world for his contribution to cinema. I had the opportunity to meet his family members at 7, LKM. Here are the highlights… pic.twitter.com/uCdifC2S3C
— Narendra Modi (@narendramodi) December 11, 2024