Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

चामडे आणि पादत्राणे क्षेत्रात रोजगार निर्मितीसाठी विशेष पॅकेजला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता


चामडे आणि पादत्राणे क्षेत्रात रोजगार निर्मितीसाठी विशेष पॅकेजला केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. या पॅकेजनुसार,भारतीय पादत्राणे, चामडे आणि सहाय्य्यक विकास कार्यक्रम या योजनेच्या अंमलबजावणीद्वारे, 2017 -18 ते 2019 -20 या तीन आर्थिक वर्षासाठी 2600 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.

यामुळे चामडे क्षेत्रातल्या पायाभूत सुविधांचा विकास होणार असून या क्षेत्राशी संबंधित पर्यावरणविषयक मुद्द्यांची दखल घेतली जाणार आहे.अतिरिक्त गुंतवणुकीला वाव मिळण्याबरोबर रोजगार निर्मितीही होणार असून उत्पादनातही वृद्धी होणार आहे.

या विशेष पॅकेजमध्ये तीन वर्षात 3.24 लाख नवे रोजगार निर्माण करण्याची क्षमता असून पादत्राणे, चामडे क्षेत्रात संचयी परिणामाने 2 लाख रोजगाराना औपचारिक स्वरूप प्रदान करण्यासाठी मदत होणार आहे.

N.Sapre/N.Chitale/P.Kor