पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने घटना (जम्मू आणि कश्मीर मध्ये लागू होण्यासाठी ) दुरुस्ती आदेश, 2019 च्या माध्यमातून घटना (जम्मू आणि कश्मीर मध्ये लागू होण्यासाठी ) दुरुस्ती संबंधी जम्मू आणि काश्मीर सरकारच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. यामुळे राष्ट्रपति द्वारा परिच्छेद 370 च्या कलम (1) अंतर्गत जारी घटना (जम्मू आणि कश्मीरमध्ये लागू होण्यासाठी ) दुरुस्ती आदेश,2019 द्वारा घटना (77वी दुरुस्ती ) कायदा 1955 आणि घटना (103 वी दुरुस्ती ) कायदा 2019 द्वारा सुधारित तरतुदी लागू होतील.
प्रभाव
अधिसूचित झाल्यावर हा आदेश सरकारी सेवामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमातींना पदोनत्ति लाभाचा मार्ग प्रशस्त करेल आणि जम्मू आणि कश्मीर मध्ये सरकारी नोकऱ्यांमध्ये सध्याच्या आरक्षणाव्यतिरिक्त आर्थिक दृष्टया दुरबा घटकांना 10 टक्के आरक्षणाचा लाभ प्रदान करेल.
B.Gokhale/S.Kane/P.Kor