गोरखपूर, सिंद्री आणि बराऊनी येथील बंद पडलेली खत एकके पुन्हा सुरु करायला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत झालेल्या केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. यात झारखंडमधील सिंद्री येथील भारतीय खत महामंडळाच्या तर गोरखपूर आणि बराऊनी येथील हिंदुस्थान खत महामंडळाच्या एककांचा समावेश आहे.
पश्चिम बंगाल, बिहार आणि झारखंडमधील युरीयाची वाढती गरज पूर्ण करण्याच्या दृष्टीने हे प्रकल्प महत्त्वाचे ठरणार आहेत तसेच हे प्रकल्प कार्यान्वित झाल्यामुळे येथील क्षेत्राच्या आर्थिक विकासालाही चालना मिळणार आहे. या एककांमुळे प्रत्यक्ष रोजगाराच्या 1200 तर अप्रत्यक्ष रोजगाराच्या 4500 संधी निर्माण होणार आहेत.
M.Pange/B.Gokhale