पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कोलकाता येथे गोडीया मिशन आणि मठाच्या शतकमहोत्सवी कार्यक्रमाचे उद्घाटन केले.
भारताच्या दीर्घकालीन सांस्कृतिक मूल्यांमागे भारताची आध्यात्मिक जाणीव असल्याचे पंतप्रधानांनी यावेळी सांगितले. गेली अनेक युगे हे आध्यात्मिक भान कायम राहिले आहे.
ही जाणीव शब्दांच्या पलिकडची आहे. वैष्णव जन तो तेणे कहिए हे त्याचे मोठे उदाहरण असल्याचे पंतप्रधान म्हणाले.
आधुनिक संदर्भात वैष्णव जन ऐवजी जन प्रतिनिधी हा शब्द सहज बसतो.
भारतीय समाजात, सुधारणा या सदैव आतून आल्या आहेत. आणि राजा राममोहन रॉय आणि ईश्वरचंद्र विद्यासागर ही त्याची प्रमुख उदाहरणे आहेत.
यानंतर पंतप्रधानांनी गोडिया मठात प्रार्थनाही केली.
N.Chitale/S.Tupe/M.Desai
Sharing my speech at the Gaudiya Mission and Math. https://t.co/Prt1L0xTwQ
— Narendra Modi (@narendramodi) February 21, 2016