Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

गेल्या नऊ वर्षांत स्टार्टअप इंडिया या परिवर्तनशील उपक्रमाने असंख्य तरुणांना सक्षम बनवण्याबरोबरच त्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पनांचे रुपांतर यशस्वी स्टार्टअपमध्ये केले : पंतप्रधान


नवी दिल्ली , 16 जानेवारी 2025

स्टार्टअप इंडिया उपक्रम सुरू होऊन आज नऊ वर्षं पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या उपक्रमाचा आढावा घेतला. गेल्या नऊ वर्षांत या परिवर्तनशील उपक्रमाने असंख्य युवकांना सक्षम केले आहे आणि त्यांच्या नावीन्यपूर्ण कल्पनांचे रूपांतर यशस्वी स्टार्टअप्समध्ये केल्याचे मत पंतप्रधानांनी व्यक्त केले आहे. शासकीय पातळीवर स्टार्टअप संस्कृती रुजवण्यासाठी सरकारने सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत, असेही त्यांनी सांगितले. सध्याचा भारत हा गतिमान, आत्मविश्वास असलेला आणि भविष्यासाठी सज्ज असल्याचं स्टार्टअप इंडियाच्या यशातून दिसून येते असेही ते म्हणाले. “स्टार्टअपमधल्या प्रत्येक युवकाची मी प्रशंसा करतो आणि अधिकाधिक युवकांनी स्टार्टअपकडे वळावे असं आवाहन करतो. तुम्ही निराश होणार नाही याची ग्वाही मी देतो.” असे मोदी पुढे म्हणाले

पंतप्रधानांनी  X वरच्या संदेशात म्हटले आहे:

“आज आपण स्टार्टअप इंडियाची नऊ वर्ष साजरी करत आहोत.या महत्त्वाच्या उपक्रमाने नवकल्पना,व्यावसायिकता आणि विकासाची नव्याने व्याख्या केली गेली आहे.हा माझ्या मनाच्या अगदी जवळ असलेला उपक्रम आहे. युवकांच्या सक्षमीकरणासाठी हा उपक्रम म्हणजे एक शक्तिशाली मार्ग आहे. गेल्या नऊ वर्षांत या उपक्रमाने असंख्य युवकांना सक्षम केलं आणि त्यांच्या नवकल्पनांचे रुपांतर यशस्वी स्टार्टअपमध्ये केले.”

“शासकीय पातळीवर स्टार्टअप संस्कृती रुजवण्यासाठी सरकारने सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत.आमच्या धोरणांचा भर व्यवसाय सुलभीकरणावर आहे.साधनसंपत्तीची अधिक उपलब्धता आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे प्रत्येक टप्प्यावर त्यांना पाठबळ देणारी ही धोरणे आहेत.आम्ही नवकल्पना आणि इनक्युबेशन सेंटरना चालना देत आहोत कारण त्यामुळे युवक जोखीम पत्करण्यासाठी सज्ज होतील.मी व्यक्तिशः उदयोन्मुख स्टार्टअपशी नियमितपणे संवाद साधतो.”

“सध्याचा भारत गतिशील,आत्मविश्वासपूर्ण आणि भविष्यासाठी सज्ज असल्याचे स्टार्टअप इंडियाच्या यशामुळे स्पष्ट होते.या वाटचालीकडे आम्ही बघतो तेव्हा उद्योगीकरणासाठीची परिसंस्था तयार करण्यासाठीची वचनबद्धता दिसते. त्यामुळे प्रत्येक स्वप्नाला उभारी मिळते आणि आत्मनिर्भर भारतासाठी योगदान दिले जाते.स्टार्टअपमधल्या प्रत्येक युवकाची मी प्रशंसा करतो आणि अधिकाधिक युवकांनी स्टार्टअपकडे वळावे असं आवाहन करतो.तुम्ही निराश होणार नाही याची ग्वाही मी देतो.”

S.Patil/P.Jambhekar/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai