Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

खासदार डी श्रीनिवास गारु यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज माजी राज्यसभा सदस्य (खासदार) डी श्रीनिवास गारु यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला.

लोकसेवा आणि गरीबांच्या उन्नतीसाठी केलेल्या प्रयत्नांसाठी गारु स्मरणात राहतील, असे ते म्हणाले. 

पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले:

माजी खासदार डी. श्रीनिवास गारु यांच्या निधनाने दु:ख झाले. लोकसेवा आणि गरिबांच्या सक्षमीकरणासाठी त्यांनी दीर्घकाळ केलेल्या प्रयत्नांसाठी ते स्मरणात राहतील. या दुःखद प्रसंगी त्यांचे कुटुंबीय आणि समर्थकांप्रति माझ्या सहवेदना : पंतप्रधान नरेंद्र मोदी “

***

M.Pange/S.Kane/P.Kor