Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

क्षयरोगाचे अधिक  रुग्ण असलेल्या जिल्ह्यांवर लक्ष केंद्रित करणारी  100 दिवसांची विशेष मोहिमेच्या सुरुवातीची पंतप्रधानांनी केली घोषणा


 

टीबी अर्थात क्षयरोगाविरुद्धचा भारताचा लढा नुकताच बळकट झाला आहे, असे सांगून पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांनी आज क्षयरोगाचे अधिक  रुग्ण असलेल्या जिल्ह्यांवर लक्ष केंद्रित करणाऱ्या  100 दिवसांच्या  विशेष मोहिमेच्या सुरुवातीची घोषणा केली. केंद्रीय आरोग्य मंत्री  जे पी नड्डा यांनी लिहिलेला लेख वाचण्याचे आवाहनही त्यांनी नागरिकांना केले.

पंतप्रधान X समाजमाध्यमावरील एका पोस्टमध्ये म्हणाले:

क्षयरोगाविरुद्धचा आमचा लढा आता बळकट झाला आहे!

क्षयरोगाला पराभूत करण्यासाठी सामूहिक भावनेने समर्थित, अधिक रुग्ण असलेल्या जिल्ह्यांवर लक्ष केंद्रित करून 100 दिवसांची विशेष मोहीम आज सुरू होत आहे. भारत क्षयरोगाशी बहुआयामी पद्धतीने लढा देत आहे:

(1) रुग्णांना दुप्पट मदत

(२) जन भागीदारी

(३) नवीन औषधे

(४) तंत्रज्ञान आणि उत्तम निदान साधनांचा वापर.

आपण सर्वांनी एकत्र येऊन क्षयरोग दूर करण्यासाठी आपापल्या परीने प्रयत्न करूया.”

केंद्रीय मंत्री जेपी नड्डा यांच्या X समाजमाध्यमावरील पोस्टला उत्तर देताना  मोदींनी लिहिले:

भारताला क्षयमुक्त करण्यासाठी सातत्याने करत असलेल्या पावलांची  सखोल माहिती आरोग्य मंत्री श्री जेपी नड्डा  देतात. जरूर वाचा.

@JPNadda”

***

S.Kakade/H.Kulkarni/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com