Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

क्रीडापटूंनी देशासाठी आपली सर्वोत्तम कामगिरी बजावावी – ‘रन फॉर रिओ’ला हिरवा झेंडा दाखवताना पंतप्रधानांचे आवाहन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत मेजर ध्यानचंद राष्ट्रीय स्टेडीयम इथे ‘रन फॉर रिओ’ला हिरवा झेंडा दाखवला.

भारतीय पथकातल्या प्रत्येक खेळाडूने या पथकात स्थान मिळवण्यासाठी कठोर परिश्रम घेतले आहेत आणि रिओ ऑलिम्पिकमधे हे खेळाडू आपली सर्वोत्तम कामगिरी बजावतील अशी खात्री पंतप्रधानांनी व्यक्त केली. भारतीय खेळाडू जगभरातल्या जनतेची मने जिंकतील आणि भारत कसा आहे याची झलक जगाला दाखवतील, असे ते म्हणाले.

2020च्या टोकीयो ऑलिम्पिकसाठी आतापासूनच तयारीला लागण्याचे आवाहन देशाला करतानाच यापुढच्या ऑलिम्पिकसाठी प्रत्येक जिल्ह्यातून किमान एक क्रीडापटू पात्र ठरेल, याकडे लक्ष पुरवण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले.

यावेळेला भारतीय क्रीडा पथक पुरेसावेळे ठेऊन पाठवण्यात आले आहे, त्यामुळे तिथले वातावरण खेळाडूंना परिचयाचे व्हायला मदत होईल.

ऑलिम्पिकसाठी या क्रीडापटूंना शुभेच्छा देतानाच खेळ हे आयुष्याची गरज आहेत. प्रत्येकाने खेळा आणि चमकदार कामगिरी करा, असे पंतप्रधान म्हणाले. ऑलिम्पिकवरच्या एका पुस्तिकेचे प्रकाशनही पंतप्रधानांनी केले.

MD/NC/DR