पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने, कौशल्य विकास क्षेत्रात सहकार्यासाठी भारत आणि स्वीस महासंघाच्या शिक्षण, संशोधन आणि नाविन्य राज्य सचिवालयादरम्यान स्वाक्षरी करण्यात आलेल्या सामंजस्य कराराला कार्योत्तर मंजुरी दिली. नेतृत्वाखाली प्रतिनिधीमंडळाने 20 ते 22 जून 2016 दरम्यान केलेल्या स्वित्झर्लंड दौऱ्यात 22 जून रोजी या सांमजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
क्षमता निर्मिती आणि कौशल्य विकास क्षेत्रातील सर्वोत्तम पध्दतींचे आदान-प्रदान यावर प्रामुख्याने या सामंजस्य कराराचा भर आहे. या कराराच्या अंमलबजावणी आराखडयाची निर्मिती, देखरेख आणि आढावा घेण्यासाठी संयुक्त कृती गट स्थापन करण्याची तरतूद या करारात आहे. हा करार कौशल्य विकास क्षेत्रात दोन्ही देशांदरम्यान, द्विपक्षीय सहकार्यासाठी आराखडा तयार करेल तसेच ही ही भागीदारी अधिक दृढ करेल.
S.Kane/B.Gokhale