देशातील कोळसा आणि दगडी कोळसा असणाऱ्या विभागातून जमिनीखालील कोळशापासून वायुनिर्मिती (यूसीजी) विकासाबाबतच्या धोरणात्मक आराखडयाला केंद्रीय मंत्रिमंडळाने 16 डिसेंबर रोजी मान्यता दिली. पारंपरिक खनन पध्दतींद्वारे काम करण्यासाठी, आर्थिकदृष्टया फायदेशीर नसणाऱ्या, कोळसा/दगडी कोळसा स्रोतांतून ऊर्जा निर्मिती करण्याची यूसीजी ही एक पध्दत आहे.
कोल बेड मिथेन (सीबीएम) विकासासाठी सध्या अस्तित्वात असणाऱ्या धोरणाच्या धर्तीवर हे धोरण असेल. या धोरणांतर्गत कोळसा क्षेत्रे स्पर्धात्मक लिलावांसाठी खुली होतील.
ऊर्जा सुरक्षा पुरवण्यासाठी यूसीजी विकास निश्चित करण्यात आला आहे. कोळसा मंत्रालयाच्या अध्यक्षतेखाली, संबंधित मंत्रालयाची आंतर-मंत्रालयीन समिती स्थापन करण्यात येईल आणि ही समिती कोळसा क्षेत्रांचा लिलाव करण्यासंदर्भात किंवा सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांना नामनिर्देशित करण्याबाबत निर्णय घेईल.
J.Patnakar/S.Tupe/M.Desai