Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

केवडिया येथे तंत्रज्ञान प्रदर्शन स्थळाचे पंतप्रधानांनी केले उद्‌घाटन


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमधल्या केवडिया येथे तंत्रज्ञान प्रदर्शन स्थळाचे उद्‌घाटन केले.

प्राणघातक शस्त्रांसह इतर शस्त्रांबरोबरच आधुनिक तंत्रज्ञानाचे दर्शन घडवणारे पोलीस आणि अर्धसैनिक दलांचे विविध स्टॉल्स येथे आहेत.

हवाई सुरक्षा, सुरक्षा दलाचे आधुनिकीकरण, डिजिटल उपक्रम यासारख्या संकल्पनांवर आधुनिक तंत्रज्ञानाचा अविष्कार सीआयएसएफ, सीआरपीएफ, बीएसएफ, एनएसजी आणि विविध राज्यांच्या पोलीस दलांनी घडवला.

विमानतळावर जलद आणि प्रभावीपणे चेहरा ओळखणाऱ्या प्रणालीची आधुनिक तंत्रज्ञानाशी सांगड घालण्याची संकल्पना सीआयएसएफने सादर केली तर एनएसजीने सुरक्षा संच, आधुनिक हत्यारं आणि रिमोट कंट्रोलद्वारे चालणारी वाहनं आणि उपकरणं सादर केली. गृह मंत्रालयाने 112 हा सर्व आपात्कालीन परिस्थितीतल्या सेवेसाठीचा क्रमांक प्रामुख्याने दर्शवला.

सीआरपीएफने आपल्या जवानांना मिळालेली शौर्य पदकं आणि सन्मान तसेच 1939 पासूनच्या पराक्रमाची गाथा, युद्ध यांची समग्र गाथा सादर केली.

गुजरात पोलिसांच्या प्रदर्शनालाही पंतप्रधानांनी भेट दिली. यामध्ये विश्वास प्रकल्प आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा आविष्कार दर्शवण्यात आला. दिल्ली पोलिसांनी डिजिटल उपक्रम ठळकपणे मांडले तर जम्मू काश्मीर पोलिसांनी सुरक्षिततेची खातरजमा करण्यासाठी उपयोगात येणारी सुरक्षा वाहने प्रदर्शनात ठेवली.

B.Gokhale/N.Chitale/P.Malandkar