Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

केनिया दौऱ्यादरम्यान पंतप्रधानांनी प्रसारमाध्यमांना दिलेले निवेदन (११ जुलै २०१६)

केनिया दौऱ्यादरम्यान पंतप्रधानांनी प्रसारमाध्यमांना दिलेले निवेदन (११ जुलै २०१६)


सन्माननीय राष्ट्रपती उहुरू केन्याता ,

उपराष्ट्रपती विल्यम रुतो,

बंधू आणि भगिनीनों

सन्माननीय राष्ट्रपती तुमच्या भावपूर्ण शब्दांसाठी मी तुमचा आभारी आहे,

मला नैरोबीला येऊन खूप आनंद होत आहे. माझे आणि माझ्या प्रतिनिधी मंडळाच्या स्वागत आणि सत्कारासाठी मी राष्ट्रपती केन्याता यांचे आभार मानतो. राष्ट्रपतीजी मला असे सांगण्यात आले आहे की, आपल्या ‘उहुरू’ या नावाचा अर्थ स्वातंत्र्य असा होतो. एका अर्थाने आपल्या जीवनाचा प्रवास हा स्वतंत्र केनियाचाच प्रवास आहे. आज आपल्या सोबत असणं हि माझ्यासाठी सन्मानाची बाब आहे.

मित्रांनो,

केनिया हा भारताचा मौल्यवान मित्र आणि विश्वसनीय भागीदार आहे. उभय देशांचे बंध जुने आणि समृद्ध आहेत. दोन्ही देशांनी वसाहतवादाविरुद्ध संघर्ष केला आहे.

उभय देशातील जनतेचे परस्परांसोबत असलेले ऐतिहासिक संबंध आपल्या व्यापक भागीदारीचा भक्कम आधार आहे.हे संबंध बहुआयामी आहेत:

• कृषी आणि आरोग्यापासून विकास सहाय्यापर्यंत;

• व्यापार आणि वाणिज्यापासून गुंतवणूकीपर्यंत;

• क्षमतावृद्धीसाठी दोन्ही देशातील नागरिकांच्या संवादापासून; आणि

• नियमित राजनैतिक विचार-विनिमायापासून संरक्षण आणि सुरक्षा सहकार्यापर्यंत

सन्माननीय राष्ट्रपती आणि मी दोघांनी उभय देशांच्या सर्वव्यापी संबंधांच्या सर्व पैलूंचा आढावा घेतला.
मित्रांनो,

भारत हे जागतिक अर्थव्यवस्थेतील एक तेजस्वी स्थान आहे आणि केनिया ही अमाप संधींची भूमी आहे. भारत हा केनियाचा सर्वात मोठा व्यापारिक भागीदार आहे आणि केनिया मध्ये गुंतवणूक करणारा सर्वात मोठा दुसरा देश आहे. परंतु याहून अधिक साध्य करण्याची क्षमता आहे.

राष्ट्रपती आणि मला हे मान्य आहे की, उभय देशांच्या अर्थव्यवस्थांना लाभ होऊ शकतो:

• जर आपण वाणिज्यिक संपर्काला अधिक गती प्रदान केली;

• जर आपण वैविध्यपूर्ण पद्धतीने व्यापार केला; आणि

• आपले गुंतवणूक बंध अधिक विस्तृत केले.

यामुळे क्षेत्रीय आर्थिक समृद्धी वृद्धिंगत होईल. यामध्ये सरकारे आपली भूमिका बजावतील, परंतु दोन्ही देशामधील व्यापारिक भागीदारी पुढे नेण्यामध्ये उभय देशांच्या व्यापाराची जबाबदारी आणि भूमिका महत्वपूर्ण आहे. याच अनुशंगाने आज होणाऱ्या भारत-केनिया व्यापार परिषदेचे मी स्वागत करतो. भारत आणि केनिया हे दोघेही विकसनशील देश आहेत. दोन्ही देश नाविन्य उपक्रमांचे पुरस्कर्ते आहेत आणि ही खूपच महत्वपूर्ण बाब आहे की नाविन्य उपक्रम मग ते प्रक्रिया, उत्पादन किंवा तंत्रज्ञान यामधील असुदे ते केवळ आमच्या समाजासाठीच सुसंगत नसते तर इतर विकसनशील देशांच्या नागरिकांचे जीवनमान विकसित करायला मदत करते. एम-पेसा हे नाविन्य उपक्रमांच्या यशस्वितेचे एक असे उदाहरण आहे ज्यामुळे जगभरातले लाखो लोक सक्षम झाले आहेत. उभय देश तंत्रज्ञानातील नाविन्य उपक्रमांच्या व्यापारीकरणावर एकत्रित काम करत आहेत आणि हे व्यापार परिषदेमध्ये देखील दिसून येईल.

मित्रांनो,

विकासाची बहुआयामी भागीदारी ही आपल्या द्विपक्षीय संबंधांचा आधार आहे. विकासासाठीचे आपले प्राधान्य कमी अधिक प्रमाणात एकसारखेच आहे. एक खरा आणि विश्वसनीय भागीदार म्हणून भारत विकास प्रक्रियेतील आपले अनुभव आणि ज्ञान केनियासोबत वाटायला तयार आहे आणि केनियाच्या विकासामध्ये कमी व्याजदरावर कर्ज आणि क्षमता वृद्धीसाठी एकत्रित काम करायला तयार आहे. कृषी यांत्रिकीकरण, वस्त्रोद्योग, लघू आणि मध्यम क्षेत्राच्या विकासासाठीच्या प्रकल्पांसाठी कर्ज द्यायला भारत उत्सुक असून उर्जा प्रेषण योजनेची प्रगती पाहून आम्ही अचंबित झालो आहोत, या प्रकल्पाकरिता भारताने ६० दशलक्ष डॉलरचे कर्ज दिले आहे. केनियाच्या यशस्वी जैव औष्णिक आणि एलईडी आधारित पथदिव्यांसारख्या उर्जा संपन्न प्रकल्पांमध्ये आपण एकत्रित काम करू शकतो. मी हे समजू शकतो की आरोग्याक्षेत्र हा राष्ट्रपती उहुरुंसाठी प्राधान्यक्रमाचा विषय आहे. भारताचे सामर्थ्य, विशेषतः औषधनिर्मिती क्षेत्रातील सामर्थ्याच्या सहाय्याने केनियामध्ये परवडणारी आणि कार्यक्षम आरोग्यप्रणाली उभारण्यामध्ये आम्ही सहभागी होऊ शकतो. यामुळे केवळ तुमच्या समाजाच्या गरजांचे भागणार नाही तर केनियाच्या क्षेत्रीय आरोग्य केंद्र म्हणून देखील विकास होईल.या अनुषंगाने मला आनंद होत आहे की, प्रतिष्ठित केन्याता राष्ट्रीय रुग्णालयात भारतामध्ये निर्मित अत्याधुनिक कर्करोग उपचार मशीन – भाभाट्रोनची सुविधा असेल. आम्ही एड्सवरील उपचारासह इतर आवश्यक औषध आणि वैद्यकीय उपकरण केनियाच्या सार्वजनिक आरोग्य प्रणालीला देत आहोत.

मित्रांनो,

आपल्या युवकांच्या यशाच्या संधींशिवाय आपल्या समाजाचा विकास होऊ शकत नाही हे आम्ही जाणतो. याचसाठी आम्ही शिक्षण, व्यावसायिक शिक्षण तसेच कौशल्य विकास क्षेत्रामध्ये केनियासोबत सहकार्य करायला तयार आहोत.

मित्रांनो,

आम्ही विकासाच्या आव्हानांबाबत सजग आहोत. सुरक्षा आणि स्थिरतेबाबतच्या चिंतांबाबत राष्ट्रपती आणि मी चर्चा केली. भारत आणि केनिया हिंद महासागराने जोडले गेले आहेत. आपल्या सागरी परंपरा समृद्ध आहेत. याचकरिता सागरी क्षेत्रातील आपले सखोल सहकार्य आपल्या एकंदरीतच संरक्षण आणि सुरक्षा कारवायांमध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावते. आत्ताच स्वाक्षऱ्या झालेल्या सरंक्षण सहकार्यावरील सामंजस्य करारामुळे आपल्या संरक्षण संस्थांमधील सहकार्य अधिक बळकट होईल. यामध्ये कर्मचाऱ्यांचे आदान – प्रदान, तज्ञ आणि अनुभवांची देवाण-घेवाण, प्रशिक्षण आणि संस्था निर्माण, हायड्रोग्राफी सहकार्य आणि उपकरणांचा पुरवठा यांचा समावेश आहे. राष्ट्रपती आणि मला हे मान्य आहे की दहशतवाद आणि मूलगामी विचारंचा वेगाने होणार प्रसार ही आपला समाज, आपला देश आणि संपूर्ण जगासमोरील समान आव्हाने आहेत. सायबर सुरक्षा, अंमलीपदार्थ आणि मानवी तस्करी विरुद्धच्या लढाईसह सर्व क्षेत्रांमध्ये सुरक्षा भागीदारी अधिक सखोल करण्याबाबत आमचे एकमत झाले आहे.

मित्रांनो,

राष्ट्रपती आणि मी काल केनियामध्ये भारतीय समुदायासोबत अविस्मरणीय संवाद साधला. जसे की राष्ट्रपती उहुरू यांनी सांगितले की, ते भारतीय वंशाचे असले तरी एक अभिमानी केनियायी आहेत. आपली अर्थव्यवस्था आणि समाजांमधील सखोल संबंधांमुळे विश्वासार्ह्य सहकार्याचा आधार तयार होतो. मला हे जाहीर करताना खूप आनंद होत आहे की या वर्षाच्या अखेरीला केनियामध्ये भारत महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे.

सन्माननीय राष्ट्रपती उहुरू

शेवटी पुन्हा एकदा तुम्ही केलेल्या माझ्या स्वागतासाठी मी तुमचे, केनियाच्या सरकारचे आणि जनतेचे आभार मानतो.
मी तसेच भारतीय नागरिक भविष्यात तुमचे भारतात स्वागत करण्याकरिता उत्सुक आहोत.

धन्यवाद.

खूप खूप धन्यवाद.

S. Mhatre/B.Gokhale