Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

केंद्र सरकार आसाममधील पूरस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहे आणि सर्वतोपरी मदत पुरविण्यासाठी राज्य सरकारसोबत समन्वय राखून काम करत आहे : पंतप्रधान


नवी दिल्ली, 23 जून 2022

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे की, केंद्र सरकार आसाममधील पूरस्थितीवर सातत्याने देखरेख ठेवून असून या आव्हानात्मक परिस्थितीवर मात करण्याच्या दृष्टीने शक्य ती सर्व मदत पुरविण्यासाठी राज्य सरकारसोबत समन्वय राखून काम करत आहे.

ट्वीट संदेशांच्या मालिकेत पंतप्रधान म्हणाले;

गेल्या काही दिवसांमध्ये आसामच्या काही भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. आसाममधल्या परिस्थितीवर केंद्र सरकार निरंतरपणे लक्ष ठेवून  आहे आणि या आव्हानात्मक परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शक्य ती सर्व मदत पुरविण्याच्या दृष्टीने आसाम राज्य सरकारसोबत एकत्र येऊन काम करत आहे.

पूरग्रस्त भागात भारतीय सेना तसेच राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाची पथके काम करत आहेत. तिथल्या नागरिकांना बाहेर काढून बचावकार्य करण्यासोबतच ती  पुरामुळे  प्रभावित झालेल्यांना मदत देखील करत आहेत. बचावकार्य प्रक्रियेचा भाग म्हणून हवाई दलाच्या विमानांनी त्या भागात 250 हून अधिक फेऱ्या केल्या आहेत.

आसामचे मुख्यमंत्री @himantabiswa,आसाम राज्य सरकारचे मंत्री तसेच अधिकारी पूरग्रस्त जिल्ह्यांमध्ये अहोरात्र काम करत असून पीडितांना मदत करत आहेत. पूरग्रस्त भागातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी तसेच क्षेमकुशलतेसाठी मी प्रार्थना करतो आणि सर्वतोपरी मदत करण्याची  पुन्हा एकदा ग्वाही  देतो.

 S.Kulkarni/S.Chitnis/P.Malandkar

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com