केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय आयुष मिशन योजना 1एप्रिल 2017 पासून 31 मार्च 2020 पर्यंत सुरु ठेवायला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. यासाठी तीन वर्षाकरिता 2400 कोटी रुपये खर्च येणार आहे. 2014 च्या सप्टेंबरमध्ये हे मिशन सुरु झाले आहे.
वाजवी दरात आयुष सेवा पुरवण्याच्या उद्देशाने आयुष मंत्रालय राष्ट्रीय आयुष मिशन राबवते.आयुष रुग्णालये आणि दवाखान्यांचा दर्जा उंचावणे, प्राथमिक आरोग्य केंद्रे,जिल्हा रुग्णालयात आयुष सेवा पुरवणे ही या मिशनची वैशिष्टये आहेत.
देशात विशेषतः दुर्गम भागात आयुष आरोग्य सेवा/ शिक्षण पुरवून राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या प्रयत्नांना जोड देऊन आरोग्य सेवेतली त्रुटी दूर करण्यासाठी राष्ट्रीय आयुष मिशन हाती घेण्यात आले आहे.मिशन अंतर्गत या विभागातल्या विशिष्ट गरजांवर विशेष लक्ष पुरवण्यात येते.
या मिशनमुळे आयुष सेवेअंतर्गत आरोग्य सुविधांची संख्या वाढवून आणि उत्तम औषध आणि प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध करून आयुष आरोग्य सेवांची व्याप्ती वाढणार आहे.
त्याचबरोबर सुसज्ज आयुष शैक्षणिक संस्थांची संख्या वाढवून त्याद्वारे आयुष शिक्षणात सुधारणा होणार आहे.
N.Sapre/N.Chitale/P.Kor