Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

केंद्रीय राखीव पोलिस दलात “अ” गट अधिकाऱ्यांचा समूह आढावा


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत केंद्रीय राखीव पोलिस दलातल्या “अ”गट अधिकाऱ्यांच्या समूहाची पाहणी करण्यात आली. या पाहणीत उच्च कमांडर ते विशेष महानिरीक्षक विविध स्तरापर्यंत 90 पदांच्या निर्मितीला मान्यता देण्यात आली. केंद्रीय राखीव पोलिस दलात ही नवी पदे निर्माण झाल्यानंतर या दलाची कार्यक्षमता तसेच प्रशासकीय क्षमतेत भर पडेल.

या आढाव्यामुळे “अ” गटातल्या पदांमध्ये 4 हजार 210 वरुन 4 हजार 300 एवढी वाढ होणार आहे. यामध्ये विशेष महासंचालकांच्या पदात एकाने वाढ, महासंचालकांच्या पदांमध्ये एकूण 11 पदांची वाढ, कमांडर/डीआयजीच्या पदांमध्ये 277 पदांची वाढ, तर डेप्युटी कमांडरच्या पदांमध्ये 199 पदांची घट यांचा समावेश आहे.

J.Patnakar/B.Gokhale