Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ सीबीएसई ने इयत्ता बारावीचे निकाल जाहीर केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले विद्यार्थ्यांचे अभिनंदन


नवी दिल्ली, 22 जुलै 2022

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ सीबीएसईने  इयत्ता बारावीचे निकाल जाहीर केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

अनेक ट्वीटसच्या  मालिकेत पंतप्रधान म्हणाले :

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ सीबीएसईच्या इयत्ता बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या माझ्या सर्व युवा मित्रांचे अभिनंदन. या तरुणांची जिद्द आणि निष्ठा वाखाणण्याजोगी आहे. संपूर्ण मानवतेला  जेव्हा असाधारण अशा आव्हानाचा सामना करावा लागला  त्या काळात या विद्यार्थ्यांनी  परीक्षेची तयारी केली आणि यश संपादन केले, असे पंतप्रधान म्हणाले.

‘केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ सीबीएसईच्या इयत्ता बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या  आमच्या शूर परीक्षा योद्ध्यांची  प्रतीक्षा अगणित संधी करत आहेत.त्यांनी आपल्या आपल्या अंत:प्रेरणेचा आवाज ऐकावा आणि त्यांना रुची असेल त्या विषयात प्राविण्य मिळवावे. त्यांच्या भविष्यातील कामगिरीबद्दल माझ्या हार्दिक शुभेच्छा‘

काही विद्यार्थी त्यांच्या निकालावर नाखूष  असतील मात्र त्यांनी हे समजून घ्यायला हवे की केवळ एका परीक्षेवर त्यांचे भवितव्य अवलंबून नसते. मला खात्री आहे की येणाऱ्या काळात ते अधिक उज्ज्वल यश संपादन करतील. याव्यतिरिक्त यावर्षी आम्ही परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमात परीक्षेच्या वेगवेगळ्या पैलूंवर केलेल्या चर्चेचे मुद्दे  सामायिक करत आहे, असे पंतप्रधान म्हणाले.

S.Tupe/B.Sontakke/P.Malandkar