Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

केंद्रीय मंत्री अनंत कुमार यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त


 

केंद्रीय मंत्री अनंत कुमार यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे.

पंतप्रधान म्हणाले, ‘माझे जीवलग सहकारी आणि मित्र अनंत कुमारजी यांच्या निधनाने अतीव दु:ख झाले आहे. ते विलक्षण नेते होते. त्यांनी तरुण वयातच सार्वजनिक जीवनात प्रवेश केला आणि मेहनतीने व तळमळीने समाजाची सेवा केली. त्यांनी केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल ते नेहमीच स्मरणात राहतील.

मी त्यांच्या पत्नी डॉ. तेजस्विनी यांच्याशी बोललो आणि अनंत कुमार यांच्या निधनाबद्दल शोकभावना व्यक्त केल्या. या दु:खद प्रसंगी त्यांचे कुटुंबीय, मित्र आणि समर्थकांच्या दु:खात मी सहभागी आहे. ओम शांती.’

 

B.Gokhale/S.Kane/P.Kor