नवी दिल्ली, 21 फेब्रुवारी 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने 2021-22 ते 2025-26 (15 व्या वित्त आयोगाचा कालावधी) या 5 वर्षांच्या कालावधीसाठी 4,100 कोटी रुपये खर्चाची “पूर व्यवस्थापन आणि सीमा क्षेत्र कार्यक्रम (एफ एम बी ए पी) केंद्र पुरस्कृत योजना सुरू ठेवण्यासाठी जलसंपदा, नदी विकास आणि गंगा पुनरुज्जीवन विभागाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली.
या योजनेचे दोन घटक आहेत:
पूर नियंत्रणाची प्राथमिक जबाबदारी राज्यांची असली तरी या कामात राज्य सरकारांना प्रोत्साहन देऊन तसेच आधुनिक तंत्रज्ञान आणि अत्याधुनिक सामग्री किंवा दृष्टिकोन प्रदान करण्यासाठी राज्य सरकारांच्या प्रयत्नांना हातभार लावण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. गेल्या काही वर्षांमध्ये अशाप्रकारच्या गंभीर घटनांचे प्रमाण वाढत असल्याने आणि हवामान बदलाचा संभाव्य परिणाम पाहता येत्या काळात पुराच्या समस्येची वारंवारता, तीव्रता आणि विस्तार वाढण्याची शक्यता दिसत असल्याने हा निर्णय अतिशय समर्पक आहे. नदी व्यवस्थापन आणि सीमा क्षेत्र या घटकाअंतर्गत कार्यान्वित झालेल्या प्रकल्पांमुळे सीमारेषेवर असलेल्या नद्यांवरील सुरक्षा दले, सीमा चौकी इत्यादीं महत्त्वाच्या आस्थापनांचे पूर आणि धूप यापासून संरक्षण होते. पूर व्यवस्थापनासाठी प्रभावी गैर-संरचनात्मक उपाय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फ्लड प्लेन झोनिंगची अंमलबजावणी करणाऱ्या राज्यांना प्रोत्साहन देण्याची तरतूद या योजनेत आहे.
* * *
Jaydevi PS/B.Sontakke/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai@gmail.com /PIBMumbai /pibmumbai