नवी दिल्ली, 26 एप्रिल 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने आज राष्ट्रीय वैद्यकीय उपकरण धोरण 2023 ला मंजुरी दिली.
भारतातील वैद्यकीय उपकरणे क्षेत्र हे भारतीय आरोग्य सेवा क्षेत्राचा एक आवश्यक आणि अविभाज्य घटक आहे. व्हेंटिलेटर, रॅपिड अँटीजेन टेस्ट किट्स, रिअल-टाईम रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन -RTPCR किट्स , इन्फ्रारेड (IR) थर्मामीटर, वैयक्तिक संरक्षणात्मक उपकरणे (PPE) किट आणि N-95 मास्क यांसारख्या वैद्यकीय उपकरणे आणि नैदानिक किट्सचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करून कोविड-19 महामारीविरुद्धच्या देशांतर्गत आणि जागतिक लढाईत भारतीय वैद्यकीय उपकरण क्षेत्राचे योगदान अधिक ठळकपणे दिसून आले आहे.
भारतातील वैद्यकीय उपकरणे क्षेत्र हे उदयोन्मुख क्षेत्र आहे जे जलद गतीने वाढत आहे. 2020 मध्ये भारतातील वैद्यकीय उपकरणे क्षेत्राच्या बाजारपेठेचा आकार 11 अब्ज डॉलर्स (अंदाजे 90,000 कोटी रुपये ) होता असा अंदाज आहे आणि जागतिक वैद्यकीय उपकरणांच्या बाजारपेठेतील त्याचा वाटा 1.5% असल्याचा अंदाज आहे. भारतीय वैद्यकीय उपकरणे क्षेत्राची घोडदौड सुरु असून स्वयंपूर्ण बनण्याची आणि सार्वत्रिक आरोग्य सेवेचे उद्दिष्ट गाठण्यात योगदान देण्याची त्यात प्रचंड क्षमता आहे. केंद्र सरकारने याआधीच वैद्यकीय उपकरणांसाठी उत्पादन संलग्न प्रोत्साहन योजनेची अंमलबजावणी सुरू केली असून हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, तामिळनाडू आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये 4 वैद्यकीय उपकरण पार्क उभारण्यासाठी सहाय्य पुरवले आहे.
या उपायांवर आधारित, या विकासाला गती देण्यासाठी आणि या क्षेत्राची क्षमता पूर्ण करण्यासाठी एक समग्र धोरण आराखडा तयार करणे ही काळाची गरज आहे. सध्याच्या धोरणाचे उद्दिष्ट म्हणजे समन्वित पद्धतीने क्षेत्राच्या वाढीसाठी लक्ष्यीत क्षेत्रांचा सर्वसमावेशक संच निर्धारित करणे होय. दुसरे म्हणजे, वैद्यकीय उपकरण उद्योगाचे कौशल्य व्यापार प्रोत्साहन केंद्र आणि राज्य या दोन्ही स्तरांवर सरकारमधील अनेक विभागांमध्ये व्यापलेले आहे. सुसंगत पद्धतीने हस्तक्षेपांची श्रेणी एकत्रित करण्याची गरज आहे.
उपलब्धता, किफायतशीरपणा, गुणवत्ता आणि नवोन्मेष या सार्वजनिक आरोग्य उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी राष्ट्रीय वैद्यकीय उपकरण धोरण, 2023 द्वारे वैद्यकीय उपकरण क्षेत्राची सुव्यवस्थित वाढ सुलभ करणे अपेक्षित आहे. देशांतर्गत गुंतवणुकीला प्रोत्साहन देणे आणि वैद्यकीय उपकरणांचे उत्पादन हे सरकारच्या ‘आत्मनिर्भर भारत’ आणि ‘मेक इन इंडिया’ कार्यक्रमांना पूरक आहे.
राष्ट्रीय वैद्यकीय उपकरणे धोरण, 2023 ची ठळक वैशिष्ट्ये
दृष्टिकोन : रुग्ण केंद्री दृष्टिकोनासह, विकासाचा वाढवलेला वेग आणि वैद्यकीय उपकरणे आणि नवोन्मेष क्षेत्रात, जागतिक नेतृत्व म्हणून उदयास येण्यासाठी, येत्या 25 वर्षात, जागतिक बाजारात आपला वाटा 10-12% नी वाढवणे. या धोरणानुसार, देशातील वैद्यकीय उपकरणे क्षेत्र, आजच्या 11 अब्ज डॉलर्सपासून 2030 पर्यंत 50 अब्ज डॉलर्सपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे.
ध्येय : या धोरणाअंतर्गत, वैद्यकीय उपकरणे क्षेत्राचा वेग वाढवण्यासाठीचा आराखडा तयार करण्यात आला आहे. आणि हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी, ह्या सर्वांना सहज उपलब्धता आणि सार्वत्रिकता, परवडणाऱ्या दरात उपकरणे, गुणवत्ता, रुग्ण केंद्री दृष्टिकोन आणि दर्जाबद्दल सजगता, प्रतिबंधात्मक आणि प्रोत्साहनपर आरोग्य, सुरक्षा,संशोधन आणि नवोन्मेष तसेच कुशल मनुष्यबळ, अशा उपाययोजना करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.
वैद्यकीय उपकरण क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठीची धोरणे:
विविध प्रकारच्या धोरणांच्या आधारे, वैद्यकीय उपकरण क्षेत्राला सुविधा आणि मार्गदर्शन केले जाईल, ज्या अंतर्गत, ह्या क्षेत्रात, सरकार खालील प्रमुख सहा ठिकाणी मदतीसाठी हस्तक्षेप करेल:
* * *
Jaydevi/Sushama/Radhika/Vasanti/D.Rane
This is an important decision taken by the Cabinet, which will boost the health sector and further our efforts to make India a leader in making as well as exporting medical devices. https://t.co/EKQn6bmcNf https://t.co/LqnXxscDnA
— Narendra Modi (@narendramodi) April 27, 2023