Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

केंद्रीय मंत्रिमंडळाचे मेट्रो रेल्वेला प्रोत्साहन, नोएडा – ग्रेटर नोएडा मेट्रो प्रकल्पाला मान्यता


नोएडा – ग्रेटर नोएडा या 29.707 किलोमीटर लांबीच्या मेट्रो प्रकल्पाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. 5503 कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पामुळे दिल्लीतल्या रस्ते वाहतुकीवरचा ताण कमी होणार आहे. त्याचबरोबर या भागात निवासी आणि व्यावसायिक आस्थापने विकसित होऊन या भागाचा विकास व्हायला मदत होणार आहे. मेट्रोमुळे प्रवासाचा वेळ कमी होणार असून, प्रदूषणही कमी होणार आहे. नोएडा आणि ग्रेटर नोएडा आणि आजूबाजूच्या परिसरातल्या सुमारे 7.50 लाख लोकांना या मेट्रोचा फायदा होणार आहे.

या प्रकल्पामुळे कुशल, अर्ध कुशल आणि अकुशल कामगारांसाठी, थेट आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार आहे. बांधकाम आणि कार्यान्वयन टप्प्यात मोठ्या प्रमाणात अप्रत्यक्ष रोजगार निर्मितीही होणार आहे.

एप्रिल 2018 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होणे अपेक्षित आहे.

N.Sapre/N.Chitale/D.Rane