पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत केंद्रीय नागरी सेवा आयोग आणि भूतानच्या रॉयल सिव्हिल सर्व्हिस कमिशन दरम्यानच्या सामंजस्य कराराला मान्यता देण्यात आली.
या सामंजस्य करारामुळे यूपीएससी आणि आरसीएसपी दरम्यानचे संबंध अधिक दृढ होतील तसेच नोकरभरतीच्या क्षेत्रातील अनुभव आणि ज्ञान यांची देवाणघेवाण करणे सुलभ होईल. समान आदर्श असणाऱ्या दोन्ही देशातील संस्थात्मक जोडणी विकसित करण्यासाठी या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात येतील. सहकार्याच्या क्षेत्रांमध्ये पुढील क्षेत्रांचा समावेश आहे.
1) नोकरभरती, व्यावसायिक कौशल्य, विकास आणि रिसोर्स पर्सन यांची देवाणघेवाण तसेच विविध कर्मचाऱ्यांची दोन्ही आयोगांमध्ये प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत नियुक्ती
2) परिक्षा प्रक्रियेमध्ये माहिती तंत्रज्ञान, संगणक आधारित नियुक्ती चाचणी आणि परिक्षा, त्वरित निपटारा प्रकरणे आणि एकल खिडकी पध्दतीतील अनुभवाची देवाणघेवाण इत्यादी
3) अहवालाचे डिजिटायझेशन, साठवणूक आणि ऐतिहासिक अहवालांचे प्रकाशन इत्यादींचा समावेश आहे.
B.Gokhale