Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाच्या गट “अ” कार्यकारी केडरचा फेर आढावा घ्यायला मंत्रिमंडळाची मंजुरी


केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाच्या गट “अ” कार्यकारी केडरचा फेर आढावा घ्यायला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.सहायक कमांडट ते अतिरिक्त महासंचालकापर्यंत विविध श्रेणीतल्या 25 पदांच्या निर्मितीची तरतूद यात आहे. यामुळे वरिष्ठ सुपरवायझरी कर्मचाऱ्यात वाढ होणार आहे.

फेर रचनेमुळे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाच्या गट अ मध्ये पद संख्या 1252 वरून 1277 वर पोहोचणार आहे. अतिरिक्त महासंचालकाची दोन पदे, महा निरीक्षकांची सात,उप महा निरीक्षकांची आठ तर कमांडटची आठ पदे वाढणार आहेत.

परिणाम – केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाच्या गट “अ” मध्ये या पद निर्मितीमुळे बलाची पर्यवेक्षीय क्षमता निर्मितीत वृद्धी होणार आहे.त्याच बरोबर योग्य वेळी करण्यात आलेल्या या पद निर्मितीमुळे प्रशासकीय क्षमतेत भर पडणार आहे.

N.Sapre/N.Chitale/Anagha