पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने केंद्रीय आरोग्य सेवेतील डॉक्टरांव्यतिरिक्त अन्य डॉक्टरांच्या निवृत्तीची वयोमर्यादा ६५ वर्षांपर्यंत पुढील पद्धतीने वाढवायला मंजुरी दिली आहे.-
१. भारतीय रेल्वे वैद्यकीय सेवेतील डॉक्टरांचे निवृत्तीचे वय ६५ वर्षांपर्यंत वाढवायला कार्योत्तर मंजुरी
२. नौवहन मंत्रालयांतर्गत प्रमुख पोर्ट ट्रस्ट (स्वायत्त संस्था) मधील डॉक्टर्स आणि उच्च शिक्षण विभागाअंतर्गत केंद्रीय विद्यापीठे आणि आयआयटीमध्ये काम करणाऱ्या डॉक्टरांसाठी निवृत्तीचे वय ६५ वर्षापर्यंत वाढवायला कार्योत्तर मंजुरी
३. संबंधित मंत्रालयांच्या /विभागांच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली असलेल्या डॉक्टरांसाठी निवृत्तीची वयोमर्यादा ६५ वर्षापर्यँत वाढवली
४. ६२ व्या वर्षापर्यंतच डॉक्टरांना प्रशासकीय पद भूषवता येईल आणि त्यांनतर त्यांचा सेवाकाळ बिगर-प्रशासकीय पदांमध्ये राहील या निर्णयालाही केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली.
या निर्णयामुळे उत्तम रुग्ण सेवा , वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये योग्य शैक्षणिक उपक्रम, आणि उत्तम आरोग्य सेवा पुरवण्यासाठी राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात मदत मिळेल.
केंद्र सरकारच्या विविध मंत्रालये/विभागांच्या अंदाजे १४४५ डॉक्टरांना याचा लाभ मिळेल.
या निर्णयामुळे फारसा आर्थिक बोजा पडणार नाही कारण बहुतांशी पदे रिक्त आहेत आणि मंजूर पदांच्या तुलनेत सध्याचे अधिकारी त्यांच्या अधिकारात काम सुरु ठेवू शकतात.
N.Sapre/S.Kane