Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

कुल्लू दसरा सोहळ्यात पंतप्रधान झाले सहभागी

कुल्लू दसरा सोहळ्यात पंतप्रधान झाले सहभागी


पंतप्रधान नरेंद्र मोदी आज हिमाचल प्रदेशातील कुल्लू येथील धालपूर मैदानावर आयोजित कुल्लू दसरा सोहळ्यात सहभागी झाले.

पंतप्रधानांचे आगमन झाल्यावर त्यांचे स्वागत आणि सत्कार करण्यात आला.  यानंतर भगवान रघुनाथजींचे आगमन झाले आणि  रथयात्रेला प्रारंभ झाला.  यावेळी पंतप्रधानांच्या स्वागतासाठी मोठी गर्दी जमली  होती. पंतप्रधान इतर लाखो भाविकांसह मुख्य आकर्षणाच्या ठिकाणी गेले आणि त्यांनी भगवान रघुनाथांना वंदन केले. यावेळी पंतप्रधानांनी  उपस्थित सर्वांना हात जोडून नमस्कार केला आणि ऐतिहासिक कुल्लू दसरा सोहळ्याला उपस्थित  अनेक देव -देवतांच्या साक्षीने  रथयात्रेला उपस्थित राहिले. हा  एक ऐतिहासिक प्रसंग असून प्रथमच  भारताचे पंतप्रधान कुल्लू दसरा सोहळ्यात सहभागी झाले होते.

आंतरराष्ट्रीय कुल्लू दसरा महोत्सव 5 ते 11 ऑक्टोबर 2022 पर्यंत  कुल्लूच्या धालपूर मैदानावर साजरा केला जाणार आहे. खोऱ्यातील 300 हून अधिक देव- देवतांच्या समावेशामुळे खऱ्या  अर्थाने हा सण अद्वितीय आहे. उत्सवाच्या पहिल्या दिवशीसुशोभित पालखीतील मुख्य देवता भगवान रघुनाथजींच्या मंदिरात वंदन  करतात आणि नंतर धालपूर मैदानाकडे रवाना होतात.

पंतप्रधानांबरोबर हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री  जय राम ठाकूर, हिमाचल प्रदेशचे राज्यपाल  राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री  अनुराग ठाकूर आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष  सुरेश कुमार कश्यप आदी उपस्थित होते.

तत्पूर्वी पंतप्रधानांनी बिलासपूर एम्सचे लोकार्पण केले.  बिलासपूर मधील  लुहनु येथे त्यांनी हिमाचल प्रदेशातील विविध  प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणीही  केली.

 

***

S.Patil/S.Kane/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai