Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेडच्या शताब्दी कार्यक्रमाला पंतप्रधानांची उपस्थिती


किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेडचा शताब्दी कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज नवी दिल्लीत झाला. किर्लोस्कर ब्रदर्स मिलिटेडच्या शतकपूर्तीनिमित्त पंतप्रधानांनी एका टपाल तिकीटाचे प्रकाशन केले. किर्लोस्कर ब्रदर्सचे संस्थापक, दिवंगत लक्ष्मणराव किर्लोस्कर यांच्या चरित्राच्या ‘यात्रिक की यात्रा- द मॅन हू मेड मशीन्स’ या हिंदी आवृत्तीचे प्रकाशनही पंतप्रधानांच्या हस्ते झाले.

शताब्दी समारंभानिमित्त किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेडचे अभिनंदन करत, जोखीम पत्करण्याची नव्या क्षेत्रात पाऊल टाकून त्याचा विस्तार ही आजही भारतीय उद्योजकांची आजही ओळख आहे. देशाचा विकास आणि आपल्या क्षमता विस्तारण्यासाठी भारतीय उद्योजक अधीर असल्याचे पंतप्रधान म्हणाले.

नव्या वर्षात प्रवेश करतांना आपण नव्या दशकातही प्रवेश करत आहोत, हे दशक भारतीय उद्योजकांचे असेल, असे पंतप्रधान म्हणाले.

सरकार जेव्हा उद्योगांचा अडथळा नव्हे तर भागीदार म्हणून उभे रहाते तेव्हाच देशाच्या जनतेचे खरे सामर्थ्य समोर येते.

इराद्यासह सुधारणा, प्रभावी कामगिरी आणि आमुलाग्र बदल हा मागच्या वर्षांतला आमचा दृष्टीकोन राहीला आहे. गेल्या पाच वर्षात देशात प्रामाणिकपणे आणि पूर्णत: पारदर्शकतेसह काम करण्याचे वातावरण राहीले आहे. यामुळे देशाला विशाल उद्दिष्ट ठेवून ते वेळेत साध्य करण्यासाठी प्रोत्साहन मिळते, असे त्यांनी सांगितले.

2018-19 या आर्थिक वर्षात युपीआयमार्फत 9 लाख कोटी रुपयांचे व्यवहार झाले. या वित्तीय वर्षात डिसेंबर पर्यंत 15 लाख कोटी रुपयांचे व्यवहार युपीआयमार्फत झाले. यावरुन देश किती वेगाने डिजिटल व्यवहार स्वीकारत आहे याची प्रचिती येते. कालच उज्वला योजनेला 5 वर्ष पूर्ण झाली. देशात 36 कोटी एलईडी बल्बचे वितरण झाले ही समाधानाची बाब आहे.

मेक इन इंडिया मोहीमेची यशोगाथा आपल्या उद्योगासाठी बळ देत आहेत. भारतीय उद्योगाच्या प्रत्येक क्षेत्रात आपल्याला अशा यशोगाथा हव्या असल्याचे पंतप्रधान म्हणाले.

B.Gokhale/N.Chitale/D.Rane