पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून विकसित भारत संकल्प यात्रेच्या (व्हीबीएसवाय) लाभार्थींशी संवाद साधला. लोककल्याणकारी योजनांचा लाभ सर्व लक्ष्यित लाभार्थींपर्यंत वेळेत पोहोचेल, याची खात्री करून सरकारच्या प्रमुख योजनांच्या उद्देशाची परिपूर्णता करण्यासाठी देशभरात विकसित भारत संकल्प यात्रा काढण्यात येत आहेत.
जम्मू आणि काश्मीर येथील शेख पुरा भागातील दूध विक्रेत्या नाझिया नजीर आणि विकसित भारत संकल्प यात्रेच्या इतर लाभार्थींशी संवाद साधताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाझिया यांच्या कुटुंबातील सदस्यांबाबत विचारपूस केली. यावर नाझिया यांनी उत्तर दिले की त्यांचा नवरा ऑटोरिक्षा ड्रायव्हर आहे आणि त्यांची दोन मुले सरकारी शाळांमधून शिक्षण घेत आहेत.
मागील काही वर्षांच्या तुलनेत त्यांच्या गावात झालेल्या मुख्य बदलांबाबत पंतप्रधानांनी विचारले असता नाझिया नझीर यांनी उत्तर दिले की जल जीवन मिशन ही योजना त्यांच्यासाठी एक मोठा बदल घडवणारी ठरली असून त्याच्या माध्यमातून स्वच्छ आणि सुरक्षित पाण्याचा पुरवठा नळामार्फत त्यांच्या घरापर्यंत पोहोचला ,आहे जिथे नेहमीच पाण्याची समस्या होती. उज्ज्वला योजनेंतर्गत स्वयंपाकाच्या गॅस जोडणीचे फायदे, सरकारी शाळांमधून मिळणारे शिक्षण तसेच प्रधानमंत्री गरीब कल्याण अंत्योदय योजनेचा (PMGKAY) कालावधी आणखी 5 वर्षांसाठी वाढवल्याबद्दल त्यांनी पंतप्रधानांचे आभार मानले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या गावातील विकसित भारत संकल्प यात्रा (व्हीबीएसवाय) रथाला मिळणारा प्रतिसाद आणि त्याच्या फायद्याविषयी माहिती घेतली. यावेळी नाझिया यांनी सांगितले की येथील नागरिकांनी काश्मिरी संस्कृतीनुसार शुभ प्रसंगी केल्या जाणाऱ्या विधींचे अनुसरण करत या रथाचे स्वागत केले.
नाझिया नझीर यांच्याशी झालेल्या संवादावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला. काश्मीरच्या महिला शक्तीवरही त्यांनी विश्वास व्यक्त केला, ज्या सरकारच्या योजनांचा लाभ घेऊन आपल्या मुलांना शिक्षण देत आहेत आणि देशाच्या विकासाचा उद्देश समोर ठेवून वाटचाल करत आहेत. “तुमचा उत्साह माझ्यासाठी शक्तीचा स्रोत आहे, जम्मू आणि काश्मीर मध्ये विकसित भारत संकल्प यात्रेबाबत असलेला उत्साह उर्वरित देशाला सकारात्मक संदेश देऊन जातो, असेही ते म्हणाले. नवीन पिढ्यांच्या उज्ज्वल भवितव्याची ही हमी आहे, असेही पंतप्रधान म्हणाले. देशभरातील लोक विकासाच्या या संकल्प यात्रेत सामील होत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले आणि जम्मू आणि काश्मीरमधील नागरिकांनी यामध्ये दिलेल्या योगदानाबद्दल त्यांची प्रशंसा केली.
***
M.Pange/V.Yadav/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai@gmail.com /PIBMumbai /pibmumbai
Viksit Bharat Sankalp Yatra focuses on saturating government benefits, making sure they reach citizens across India. https://t.co/24KMA2DSac
— Narendra Modi (@narendramodi) December 9, 2023