Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

काश्मीरची समृद्ध संस्कृती, कला आणि हस्तकला प्रदर्शित करणाऱ्या “वितस्ता-द फेस्टिव्हल ऑफ काश्मीर” या कार्यक्रमाची पंतप्रधानांनी केली प्रशंसा


नवी दिल्‍ली, 28 जून 2023

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काश्मीरची समृद्ध संस्कृती, कला आणि हस्तकलेचे दर्शन घडविणाऱ्या “वितस्ता-द फेस्टिव्हल ऑफ काश्मीर” या वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमाची  प्रशंसा केली‌ आहे.

काश्मीरची समृद्ध कला, संस्कृती, साहित्य, कलाकुसर आणि पाककृती संपूर्ण देशापर्यंत पोहोचविण्यासाठी वितस्ता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

चेन्नईपासून सुरू झालेल्या या कार्यक्रमांच्या मालिकेची श्रीनगरमध्ये सांगता झाली, ज्यामध्ये युवावर्गाने काश्मिरी संस्कृती जाणून घेण्याविषयी अतिशय उत्साह दाखवला. काश्मीरची संस्कृती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यशाळा, कलाकुसरीवरील शिबिरे, परिसंवाद, हस्तकला प्रदर्शने यांसारख्या अनेक कार्यक्रमांचे यावेळी आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये लोकांनी भरभरून सहभाग नोंदवला  आणि काश्मीरच्या संस्कृतीची ओळख करून घेतली.

व्हितस्ता कार्यक्रमाविषयी अमृत ​​महोत्सवाच्या ट्विट श्रुंखलेला  प्रतिसाद देताना पंतप्रधानांनी हे ट्विट केले आहे;

 

* * *

N.Chitale/S.Pargaonkar/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India

@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai