कार्नेगी एन्डॉमेंन्ट फॉर इंटरनॅशनल पीसच्या शिष्टमंडळाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज भेट घेतली. विल्यम बर्नस् यांच्या नेतृत्वाखाली हे शिष्टमंडळ आले होते. भारतात केंद्र उघडण्याच्या त्यांच्या पुढाकाराचे पंतप्रधानांनी स्वागत केले. देशाची लोकशाही प्रथा आणि उदार विचार यातून प्रतिबिंबीत होत असल्याचे पंतप्रधान म्हणाले. मुक्त कलेच्या संशोधनपर वातावरणाला या केंद्रामुळे आणखी प्रोत्साहन मिळेल, तसेच भारत, अमेरिका आणि उर्वरित जगातली धोरणात्मक भागीदारी दृढ होईल, अशी आशा पंतप्रधानांनी व्यक्त केली.
N.Chitale/S.Tupe/M.Desai
Mr. William Burns, President @CarnegieEndow called on PM @narendramodi. pic.twitter.com/xBHZ20xgMo
— PMO India (@PMOIndia) April 5, 2016