Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

कानपुर हवाई तळ येथील संरक्षण विभागाची ६.५६२८ एकर जमीन केंद्रीय विद्यालय संघटनेला शाळेची इमारत बांधण्यासाठी हस्तांतरित करायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने कानपुर हवाई तळ येथील संरक्षण विभागाची ६.५६२८ एकर जमीन केंद्रीय विद्यालय संघटनेला हस्तांतरित करायला मंजुरी दिली आहे. शाळेची इमारत बांधण्यासाठी आणि अन्य संलग्न सुविधा उभारण्यासाठी तिचा वापर केला जाईल. १६ जून २०११ रोजी घेण्यात आलेल्या यापूर्वीच्या निर्णयात थोडा बदल करण्यात आला आहे. तेव्हा ८.९० एकर जमीन हस्तांतरित करायला मंजुरी देण्यात आली होती.

सध्याच्या सरकारी धोरणानुसार वार्षिक १ रुपया भाडे इतक्या कमी दराने भाडेतत्वावर ही जमीन हस्तांतरित करण्यात येईल. शाळेसाठी पायाभूत सुविधांचा विकास केंद्रीय विद्यालय संगठन त्यांच्या निकषानुसार आणि त्यांच्या स्वतःच्या निधीने करेल.

कानपुर हवाई तळ येथे केंद्रीय विद्यालय ऑगस्ट १९८५ पासून एका तात्पुरत्या बराकीत कार्यरत असून शाळेच्या गरजा ते पूर्ण करू शकत नाहीत. विद्यार्थ्यांची वाढती संख्या सामावून घेण्यात आणि आवश्यक सुविधा पुरवण्यास सध्याची जागा अपुरी आहे. जमीन हस्तांतरित झाल्यावर संगठनेला स्वतःची इमारत आवश्यक सुविधांसह बांधता येईल.

जमीन हस्तांतरणासंबंधी प्रक्रिया दोन महिन्यात पूर्ण केली जाईल.

APS/S.Tupe/S.Kane/Anagha