कांडला बंदराला दीनदयाळ बंदर कांडला असे नाव देण्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत पूर्वलक्षी प्रभावाने मान्यता देण्यात आली.
भारतात,सर्वसाधारणपणे,बंदरांना, ज्या शहरात ते वसले आहे त्या शहराचे नाव देण्याचा प्रघात आहे.मात्र काही विशिष्ट बाबतीत,यथायोग्य विचार केल्यानंतर,भूत काळातील महान नेत्यांची नावे सरकारने दिली आहेत.
दीनदयाळ बंदर कांडला असे नामकरण करून, भारताचे थोर सुपुत्र, पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी राष्ट्रासाठी दिलेल्या अमूल्य योगदानाचे स्मरण राष्ट्र करत आहे.यामुळे गुजरातमधल्या जनतेला विशेषतः,या महान नेत्याच्या योगदानाची पूर्णपणे ओळख नसलेल्या युवावर्गाला स्फूर्ती मिळणार आहे.
N.Sapre/N.Chitale/Anagha