कर्नाटक मध्ये अनुसूचित जमातीच्या यादीत ‘नायका’ला पर्याय वाचक म्हणून परिवारा आणि तलवारा जमातीचा एस आय क्रमांक 38 म्हणून समावेश करायला मंत्री मंडळाने तत्वतः मंजुरी दिली आहे.
महत्वाचा परिणाम –
यामुळे परिवारा आणि तलवारा जमातीची, अनुसूचित जमातीचा दर्जा देण्याची दीर्घ कालीन मागणी पूर्ण झाली आहे.परिवारा आणि तलवारा जमातीतली व्यक्ती कर्नाटक सरकार कडून अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र घ्याला आणि राज्यात अनुसूचित जमातीसाठी असणारे लाभ घ्यायला पात्र राहील.
पूर्व पीठिका –
अनुसूचित जमातीच्या यादीत ‘नायका’लापर्यायवाचक म्हणून परिवारा आणि तलवारा जमातीचा एस आय क्रमांक 38 म्हणून समावेश करण्याची शिफारस कर्नाटक सरकारने केली होती.
B.Gokhale/ N.Chitale