Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

करुणानिधी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी के. करुणानिधी यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले आहे.

“करुणानिधी यांच्या निधनामुळे तीव्र दु:ख झाले. देशातल्या सर्वात ज्येष्ठ नेत्यांपैकी ते एक होते. त्यांच्या निधनामुळे आपण व्यापक जनाधार असलेला नेता, ऊर्जा देणारा विचारवंत, निपुण लेखक आणि गरीब व वचिंतांच्या कल्याणासाठी जीवन वाहून घेतलेली समर्पित व्यक्ती गमावली आहे.

प्रादेशिक आशा आकांक्षाबरोबरच राष्ट्रीय प्रगतीसाठीही ते तत्पर होते. तामिळी जनतेच्या कल्याणासाठी ते कटिबद्ध होते आणि तामिळनाडूचा आवाज प्रभावीपणे उमटावा यासाठी ते कार्यरत होते.

करुणानिधी यांच्याबरोबर संवाद साधण्याची संधी मला अनेकदा मिळाली. धोरणांबाबतची त्यांची समज आणि सामाजिक कल्याणावरचा त्यांचा भर वैशिष्ट्यपूर्ण होता. लोकशाही मूल्यांच्या संरक्षणासाठी ते ठामपणे उभे राहिले. आणीबाणीला त्यांनी केलेला तीव्र विरोध कायम संस्मरणात राहील.

करुणानिधी यांच्या कुटुंबाच्या आणि त्यांच्या अगणित समर्थकांच्या दु:खात मी सहभागी आहे. देशाला आणि विशेषत: तामिळनाडूला त्यांची उणीव नेहमी जाणवेल. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो.” असे पंतप्रधानांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

B.Gokhale/S.Kakade/P.Malandkar