Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

करारांची सूची : इंडोनेशियाच्या राष्ट्राध्यक्षांचा भारत दौरा (23-26 जानेवारी 2025)


 

अ.क्र.

सामंजस्य करार / करार

1.

भारताचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आणि इंडोनेशियाचे आरोग्य मंत्रालय यांच्यातील आरोग्य सहकार्यावरील सामंजस्य करार.

2.

भारतीय तटरक्षक दल आणि बाकमला, इंडोनेशिया यांच्यातील सागरी सुरक्षा तसेच सुरक्षा सहकार्यावरील सामंजस्य करार. (नूतनीकरण)

3.

आयुष मंत्रालयाच्या फार्माकोपिया कमिशन फॉर इंडियन मेडिसिन अँड होमिओपॅथी आणि इंडोनेशियाचे अन्न आणि औषध प्राधिकरण यांच्यातील पारंपरिक औषध गुणवत्ता हमी क्षेत्रातील सामंजस्य करार.

4.

भारताचे इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय आणि इंडोनेशियाचे दळणवळण आणि डिजिटल व्यवहार मंत्रालय यांच्यात डिजिटल विकास क्षेत्रातील सहकार्यावरील सामंजस्य करार.

5.

भारताचे संस्कृती मंत्रालय आणि इंडोनेशियाचे संस्कृती मंत्रालय यांच्यातील सांस्कृतिक देवाणघेवाण कार्यक्रम. (कालावधी 2025-28)

 

अहवाल

1.

तिसरा भारत-इंडोनेशिया मुख्य कार्यकारी अधिकारी फोरम: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्रबोवो यांच्या उपस्थितीत, सह-अध्यक्षांनी इंडोनेशियाचे परराष्ट्र मंत्री आणि भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांना त्यांचा संयुक्त अहवाल सादर केला.

***

JPS/S.Mukhedkar/P.Kor

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com