Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

औषधे आणि सौदर्य प्रसाधने (सुधारणा) विधेयक 2013 मागे


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत औषधे आणि सौदर्य प्रसाधने (सुधारणा) विधेयक 2013 मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्यसभेत 29 ऑगस्ट 2013 रोजी हे विधेयक मांडण्यात आले होते. संसदेच्या स्थायी समितीने या विधेयकाचे परिक्षण करुन विधेयकातील तरतूदी सुधारण्यासाठी अनेक शिफारशी केल्या आहेत.

भारत हा जगातील सर्वाधिक औषध निर्मिती करणाऱ्या देशांपैकी एक आहे अशा उत्पादनांचे वार्षिक उत्पादन दोन लाख कोटींहून अधिक आहे. यापैकी 55 टक्के उत्पादनांची 200 हून अधिक देशांना निर्यात केली जाते. यात विकसित राष्ट्रांचाही समावेश आहे. भारतातील औषध निर्मिती क्षेत्र अनेक देशातल्या सार्वजनिक आरोग्य क्षेत्राला तुलनेने कमी किमतीत औषधे पुरविण्यात महत्त्वाची भूमिका बजावते.

S.Kulkarni/B.Gokhale