Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

ओडिशामधील अंगुल जिल्ह्यातील बस दुर्घटनेबद्दल पंतप्रधानांना तीव्र दु:ख


ओडिशामधील अंगुल जिल्ह्यात झालेल्या बस दुर्घटनेमध्ये झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे.

‘अंगुल जिल्ह्यातील बस दुर्घटना हृदय विदीर्ण करणारी आहे. ज्या कुटुंबातील सदस्य काळाने हिरावून नेले त्या परिवारांविषयी मी संवेदना व्यक्त करून जखमींची प्रकृती लवकरात लवकर सुधारावी, अशी प्रार्थना करतो’ असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

B.Gokhale/S.Bedekar/P.Kor