Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

ओडिशाचे माजी मुख्यमंत्री बिजू पटनाईक यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी वाहिली आदरांजली


नवी दिल्ली, 5 मार्च 2024

 

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओडिशाचे माजी मुख्यमंत्री बिजू पटनाईक यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली.

 

मोदी म्हणाले की, “महान बिजू पटनाईकजी यांचे दूरदर्शी नेतृत्व आणि अदम्य आत्मा अनेक पिढ्यांना प्रेरणा देत आहे.

 

एक्स च्या पोस्टमध्ये पंतप्रधान म्हणाले;

 

“मी महान बिजू पटनाईक जी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहतो. त्यांचे दूरदर्शी नेतृत्व आणि अदम्य आत्मा अनेक पिढ्यांना प्रेरणा देत आहे. आपल्या देशासाठी त्यांनी दिलेले योगदान आणि विकासासाठी त्यांची अटल बांधिलकी अनुकरणीय आहे. आज, या विशेष दिवशी, मी चंडीखोलमधील विविध प्रकल्पांचे उद्घाटन करण्यासाठी ओडिशाच्या लोकांमध्ये येण्यास उत्सुक आहे. याचबरोबर मी @BJP4Odisha सार्वजनिक सभेला देखील संबोधित करेन.

 

 

* * *

JPS/G.Deoda/D.Rane