Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

ऑस्ट्रेलियाचे गव्हर्नर- जनरल यांच्याबरोबर पंतप्रधानांची बैठक

ऑस्ट्रेलियाचे गव्हर्नर- जनरल यांच्याबरोबर पंतप्रधानांची  बैठक


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑस्ट्रेलियाचे गव्हर्नर-जनरल सन्माननीय,  डेव्हिड हर्ले यांच्‍याबरोबर आज,   24 मे 2023 रोजी ऑस्ट्रेलियातील सिडनी येथील अॅडमिरल्टी हाऊसमध्ये बैठक केली.

यावेळी, पंतप्रधानांनी 2019 मध्ये न्यू साउथ वेल्सचे गव्हर्नर या नात्याने डेव्हिड हर्ले यांनी दिलेल्या  भारत भेटीदरम्यान गव्हर्नर-जनरल यांच्याशी झालेल्या बैठकीचे स्मरण करून दिले.

दोन्ही नेत्यांनी दीर्घकालीन द्विपक्षीय भागीदारी मजबूत करण्याबाबत चर्चा केली.

पंतप्रधानांनी ऑस्ट्रेलियातील भारतीय समुदायाच्या सकारात्मक योगदानाचे आणि दोन्ही देशांना अधिक जवळ आणण्यामध्‍ये  त्यांनी निभावलेल्या भूमिकेचे स्मरण केले.

***

Jaydevi PS/Suvarna/CYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai