Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

एम. एस. स्वामिनाथन यांच्यावरच्या दोन भागातल्या पुस्तक मालिकेचे पंतप्रधानाच्या हस्ते प्रकाशन

एम. एस. स्वामिनाथन यांच्यावरच्या दोन भागातल्या पुस्तक मालिकेचे पंतप्रधानाच्या हस्ते प्रकाशन


प्रसिद्ध कृषी वैज्ञानिक डॉक्टर एम.एस. स्वामिनाथन यांच्यावरील दोन भागातल्या पुस्तक मालिकेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज प्रकाशन झाले. एम. एस. स्वामिनाथन : ” द क्वेस्ट फॉर वर्ल्ड विदाऊट हंगर”, असे या पुस्तक मालिकेचे नाव आहे. अनेक केंद्रीय मंत्री आणि इतर मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.

गुजराथचे मुख्यमंत्री म्हणून आपण काम करत असतांना प्रोफेसर स्वामिनाथन यांच्याशी सल्ला मसलत करून मृदा आरोग्य पत्रिका उपक्रम कसा सुरू केला होता याचे स्मरण पंतप्रधानांनी यावेळी केले.

स्वामिनाथन यांच्या निष्ठेची प्रशंसा करतांना ते केवळ कृषी वैज्ञानिक नव्हेतर किसान वैज्ञानिक अर्थात शेतकऱ्यांचे वैज्ञानिक असल्याचे पंतप्रधान म्हणाले, स्वामिनाथन यांच्या साधेपणाची त्यांनी प्रशंसा केली

कृषिक्षेत्रातल्या सध्याच्या आव्हानांविषयी बोलतांना, कृषिक्षेत्रातील यश भारताच्या पूर्व भागापर्यंत पोहचण्याची तसेच वैज्ञानिक आणि तंत्रज्ञान विषयक मदत घेण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

आधुनिक वैज्ञानिक पद्धत आणि पारंपरिक कृषी ज्ञान यांची सांगड घातल्यास उत्तम परिणाम मिळू शकतात यासंदर्भात त्यांनी काही राज्यांची उदाहरणे दिली . भारतातल्या प्रत्येक जिल्ह्याला स्वतःची कृषी ओळख असायला हवी असे पंतप्रधान म्हणाले यामुळे विपण प्रक्रियेला चालना मिळण्याबरोबरच औद्योगिक संकुलाच्या धर्तीवर कृषी संकुल विकसित व्हायला मदत होईल.

२०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या उद्दिष्टाबाबतीत बोलतांना यासाठी अनेक महत्वाच्या विभागात नेमका दृष्टीकोन बाळगणे आवश्यक असल्याचे पंतप्रधान म्हणाले. आधिच्याकृषी विमा योज़नांपेक्षा प्रधानमंत्री फसलं विमा योजनेला शेतकयांची जास्त पसंती लाभत असल्या बद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं यामुळे शेतकऱ्यांची जोखीम घेण्याची क्षमता वाढण्याबरोबरच संशोधन प्रयोगशाळेतून जमिनीपर्यंत पोहचवण्यासाठी मदत होईल.

डॉक्टर एम. एस. स्वामिनाथन यांनी पंतप्रधानांचे आभार मानले आणि त्यांच्या दूरदृष्टीची प्रशंसा केली तंत्रज्ञान आणि जनधोरण यातील समन्वयाच्या महत्वावर त्यांनी भर दिला.

पी.आई.बी/बी.गोखले/ एन.चितळे