Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

एमएमटीसी लिमिटेडच्या माध्यमातून जपान आणि दक्षिण कोरियाला कच्च्या पोलादाचा पुरवठा करण्यासाठी दीर्घकालीन कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली एमएमटीसी लिमिटेडच्या माध्यमातून जपानी स्टील मिल्स (जेएसएम) आणि पॉस्को दक्षिण कोरियाला +64 % फेई कन्टेन्ट ग्रेडच्या कच्च्या पोलादाचा पुरवठा आणखी पाच वर्षासाठी (1.4.2018 ते 31.3.2023) करण्यासाठी दीर्घकालीन कराराच्या नूतनीकरणाला मंजुरी दिली आहे.

 

विवरण:

विद्यमान करार(एलटीए) 31 मार्च 2018 पर्यंत वैध आहेत. जपानच्या स्टील मिल्स आणि दक्षिण कोरियाच्या पॉस्को बरोबर नूतनीकरण करण्यात आलेले करार पाच वर्षांसाठी 1.4.2018 ते  31.3.2023 पर्यंत असतील.

या करारांतर्गत दरवर्षी निर्यात केल्या जाणाऱ्या कच्च्या पोलादाचे प्रमाण 3.80 दशलक्ष टन (किमान) ते  5.50 दशलक्ष टन असेल आणि या अंतर्गत एनएमडीसी आणि बिगर एनएमडीसी  दोन्ही प्रकारचे कच्चे पोलाद असतील. बैलाडीला लम्‍पच्या निर्यातीची संख्यात्मक मर्यादा वार्षिक 1.81 दशलक्ष टन आणि बैलाडिला फाइनची निर्यातीची मर्यादा 2.71 दशलक्ष टन असेल.

या करारांतर्गत एमएमटीसीच्या माध्यमातून जेएसएम आणि दक्षिण कोरियाच्या पॉस्कोला पुढीलप्रमाणे पूरवठा केला जाईल.

 

जपानी स्टील मिल्स 3.00 ~ 4.30 दशलक्ष टन वार्षिक 

पॉस्को, दक्षिण कोरिया  0.80 ~1 .20 दशलक्ष टन वार्षिक

 

एफओबी मूल्याच्या  2.8 टक्के व्यापार मार्जिन बरोबर एमएमटीसी च्या माध्यमातून एक संस्था परिचालन आणि निर्यातीचे सध्याचे धोरण यापुढेही सुरु राहील.

 

लाभ :

या करारांतर्गत कच्च्या पोलादाच्या निर्यातीमुळे दीर्घकालीन भागीदार देश जपान आणि दक्षिण कोरिया बरोबर भारताच्या द्विपक्षीय संबंधांना मजबूत करणे आणि निर्यात बाजारपेठ मिळवण्यात मदत होईल. यामुळे देशात परकीय चलनाचा प्रवाह सुनिश्चित होईल.

या करारामुळे  भारताला आपल्या कच्च्या पोलादासाठी  अंतर्राष्‍ट्रीय बाजारपेठ मिळवणे आणि  स्थिर आर्थिक परिसंस्था  सुनिश्चित करण्यात मदत मिळेल जी खाण, वाहतूक आणि संबंधित क्षेत्रांमध्ये प्रत्‍यक्ष किंवा अप्रत्‍यक्ष रोजगार उपलब्‍ध करून देते.

 

 

N.Sapre/S.Kane/D.Rane