बोस्टनमधल्या मॅसॅच्युएटस् इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी, एमआयटीचे अध्यक्ष डॉ.रफाएल रैफ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज भेट घेतली.
शिक्षण, आरोग्य, पाणी, या क्षेत्रात एमआयटी करत असलेल्या कार्याची माहिती त्यांनी पंतप्रधानांना दिली. एमआयटीला भेट देऊन विद्यार्थी आणि फॅकल्टीशी संवाद साधावा, यासाठी डॉ.रैफ यांनी पंतप्रधानांना निमंत्रणही दिले.
स्किल इंडिया, डिजीटल इंडिया, स्टार्ट अप इंडिया या उपक्रमाअंतर्गत एमआयटीच्या कौशल्याचा वापर करण्याच्या शक्यता लक्षात घेण्याचे आवाहन पंतप्रधानांनी त्यांना केले.
एमआयटीच्या वरिष्ठ किंवा निवृत्त फॅकल्टीनी काही महिन्यांसाठी भारतात येऊन भारतीय विद्यापीठात शिकवावे, अशी सूचनाही त्यांनी केली. या सूचनेची प्रशंसा करुन याबाबत डॉ.रैफ यांनी सहकार्य देऊ केले.
रतन टाटा यावेळी उपस्थित होते.
N. Chitale / I. Jhala / M. Desai
Dr. Rafael Reif, President of Massachusetts Institute of Technology & @RNTata2000 met PM @narendramodi. pic.twitter.com/XZG7Pyqral
— PMO India (@PMOIndia) January 28, 2016