पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत पुढील प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली.
· हिंदुस्तान उर्वरक ॲण्ड रसायन लिमिटेडला (HURL) भाडेतत्वावर जमीन देणे
· एचयूआरएलकडून, हिंदुस्तान फर्टिलाइझर कॉर्पोरेशन लिमिटेड (एचएफसीएलच्या) बरौनी ऑफ इंडिया लिमिटेडच्या (एफसीआयएल) गोरखपूर व सिंद्री एककाचे पुनरुज्जीवन करण्यासाठी सवलत करार आणि जमीन भाडे करार देणे.
· गोरखपूर, सिंद्री आणि बरौनी या तीन प्रकल्पांसाठी एफसीआयएल/एचएफसीएल आणि एचयूआरएल यांच्यातील प्रतियोजन करारांना आणि इतर करारांना मंजुरी देण्यासाठी आंतर-मंत्रालयीन समितीला अधिकार देणे.
परिणाम :-
एफसीआयएल/एचएफसीएलच्या गोरखपूर, सिंद्री आणि बरौनी एककाच्या पुनरुज्जीवनामुळे खत क्षेत्रात पुरेशी गुंतवणूक निश्चित होईल. ही एकके जगदीशपूर-हल्दिया वायू वाहिनीची प्रमुख ग्राहक असतील. यामुळे पूर्वेकडील राज्यांमध्ये पायाभूत सुविधांचा विकास होऊन या राज्यांच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. तसेच देशांतर्गत युरिया उत्पादनात वाढ होऊन युरिया निर्मितीत स्वावलंबित्व वाढण्यास मदत होईल.
एचयूआरएल ही एनटीपीसी, आयओसीएल, सीआयएल आणि एफसीआयएल/एचएफसीएल यांची संयुक्त कंपनी आहे. गोरखपूर, सिंद्री आणि बरौनी खत प्रकल्पांच्या पुनरुज्जीवनासाठी 2016 मध्ये तिची स्थापना करण्यात आली आहे.
B.Gokhale/S.Kakade/P.Malandkar