Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

एन सी सी च्या रॅलीत पंतप्रधानांचे भाषण

एन सी सी च्या रॅलीत पंतप्रधानांचे भाषण

एन सी सी च्या रॅलीत पंतप्रधानांचे भाषण

एन सी सी च्या रॅलीत पंतप्रधानांचे भाषण


 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत एनसीसी म्हणजेच राष्ट्रीय छात्र सेनेच्या कॅडेट्सशी संवाद साधला. जेव्हाही आपण नवी एनसीसीच्या कॅडेट्स सोबत असतो तेव्हा जुन्या आठवणींना उजाळा मिळतो असे पंतप्रधान म्हणाले.

गेल्या एक वर्षात एन सी सी कॅडेट्सनी विविध उपक्रमांमध्ये सहभाग घेतला. स्वच्छ भारत अभियान, डिजिटल व्यवहारांचा प्रचार अशा उपक्रमांमध्ये कॅडेट्स सहभागी झाले. त्याशिवाय, केरळच्या पुरानंतर झालेल्या बचाव आणि मदत कार्यात या कॅडेट्सचा उत्स्फूर्त सहभाग घेतला, याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.

सगळे जग आज भारताकडे एक चमकता तारा महणून बघत आहे, असे पंतप्रधान म्हणाले.  भारतामध्ये केवळ विविध क्षमताच नाही, तर त्या दडलेल्या क्षमतांना संधी देण्याची व्यवस्थाही आहे, असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला. 

अर्थव्यवस्था असो की संरक्षण क्षेत्र, भारताच्या क्षमता आज सगळ्या क्षेत्रात विस्तारल्या आहेत. भारत कायमच शांततेचा पुरस्कर्ता राहिला आहे,मात्र देशाच्या सुरक्षेसाठी कोणतेही पाऊल उचलण्यास आम्ही कचरणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

संरक्षण आणि सुरक्षेविषयी गेल्या साडे चार वर्षात अनेक पावले उचलली गेल्याचे त्यांनी सांगितले. आण्विक क्षेत्रात नाभिकीय त्रिकोण साधलेल्या फार कमी देशांमध्ये भारताचा समावेश होतो, ही अतिशय अभिमानाची गोष्ट आहे असे पंतप्रधान म्हणाले. जेव्हा देश सुरक्षित असेल तेव्हाच युवकांना आपली स्वप्ने सत्यात साकारता येतील, असे मोदी यांनी सांगितले.

कॅडेट्सना घ्याव्या लागणाऱ्या परिश्रमांचा त्यांनी उल्लेख केला. विशेषतः गावातून किंवा छोट्या शहरातून आलेल्या कॅडेट्सनी घेतलेल्या मेहनतीचे त्यांनी कौतुक केले. याच संदर्भात त्यांनी ॲथलीट हिमा दासचा उल्लेख केला. गुणवत्तेला कठोर परिश्रमांची जोड दिली, तर यश निश्चित मिळते, असं मोदी म्हणाले. देशातील व्हीआयपी संस्कृती ईपीआय म्हणजेच ‘एव्हरी पर्सन इज इम्पोर्टंट’ मध्ये बदलण्याचा सरकारचा प्रयत्न सुरु आहे, असे मोदी म्हणाले.

कॅडेट्स नी सराव प्रकारच्या नकारात्मकतेपासून दूर राहावे असा सल्ला देत, स्वतः आणि देशाच्या हितासाठी काम करण्याचे आवाहन त्यांनी केले. महिलांना समान संधी देण्यासाठी सरकारने अनेक पावले उचलली आहेत, असे त्यांनी सांगितले. भारतीय हवाईदलात पहिल्यांदाच महिला फायटर पायलट नियुक्त झाल्या आहेत, असे पंतप्रधान म्हणाले.

नव्या भारतात भ्रष्टाचाराला कोणतेही स्थान नसेल, असे ठाम प्रतिपादन पंतप्रधानांनी केले. जे भ्रष्टाचार करतात, त्यांना क्षमा केली जाणार नाही, असे त्यांनी सांगितले.

स्वच्छ भारत आणि डिजिटल इंडीया सारख्या उपक्रमांमध्ये युवकांनी घेतलेल्या सहभागाचे त्यांनी कौतुक केले. सरकारच्या कल्याणकारी योजनांची माहिती जनतेपर्यत पोहोचवावी असे आवाहन त्यांनी केले. आगामी निवडणुकांमध्ये सर्व युवकांनी मतदानाचा अधिकार बजावावा, असे आवाहनही त्यांनी केले.

दिल्लीत गेल्या काही काळात अनेक नवी स्मृतिस्थळे आणि वारसास्थळे निर्माण झाली आहेत, तिथे कॅडेट्सनी नक्की भेट द्यावी, असे मोदी म्हणाले. या संदर्भात त्यांनी लाल किल्यातील क्रांती मंदिर, अलीपूर रोड येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण स्थान अशा स्थळांचा उल्लेख केला. या स्थळांना भेट दिल्यावर जनतेसाठी कार्य करण्याची नवी उर्जा मिळते, असे पंतप्रधान म्हणाले. 

 

B.Gokhale/R.Aghor/P.Kor